Eknath Shinde, Uddhav Thackeray News
Eknath Shinde, Uddhav Thackeray News Sarkarnama
देश

Supreme Court : 34 आमदार म्हणजे पक्ष नाही; सिब्बलांनी ठेवले मुद्यावर बोट

सरकारनामा ब्यूरो

Supreme Court hearing News : सत्तासंघर्ष प्रकरणात आज ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) युक्तिवाद करणार आहेत. बुधवारी झालेल्या सुनावणीत राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. त्यानंतर कपिल सिब्बल यांनीही राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

अ‌ॅड. कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात पुढील मुद्दे मांडले आहेत. सिब्बल म्हणाले, विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थित उपाध्यक्ष काम करत असतात. त्यांचे काम घटनाबाह्य होते, असे म्हणणे चुकीचे आहे. आमदारांविरोधातील अपात्रतेची कारवाई व अविश्वास प्रस्ताव या वेगवेगळ्या गोष्टी आहे. कोणत्याही स्थितीत आमदारांवरील अपात्रतेची कारवाई थांबवता येत नाही.

यावेळी सिब्बल यांनी राज्यपालांच्या चुकीच्या पद्धतीने बहुमत चाचणी बोलावली. बंडखोर 34 आमदारांनाच राज्यपालांनी शिवसेना गृहीत धरले आहे. राज्यपालांनी कोणत्या घटनात्मक अधिकारात बहुमत चाचणी बोलावली, असा सवाल त्यांनी केला.

फुटलेला एक गट म्हणजे राजकीय पक्ष नाही आहे. तरीही राज्यपालांनी त्यांना बहुमत चाचणी करण्यासाठी बोलावले. त्यामुळेच नबाम रेबिया केस चुकीची आहे. राजकीय पक्ष कोण आहे, हे निवडणूक आयोग ठरवते. गट स्वत:ला पक्ष म्हणू शकत नसल्याचेही सिब्बल म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT