Facebook
Facebook  Sarkarnama
देश

सर्व्हर डाऊनमुळे फेसबुकला 45 हजार कोटींचा फटका

सरकारनामा ब्युरो

फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि इन्स्टाग्रामचे (Instagram) जगभरातील सर्व्हर सोमवारी रात्री तब्बल सहा तासांसाठी डाऊन झाले होते. त्याचा फटका या तीनही सोशल मीडिया कंपन्यांना चांगलाच बसला आहे. फेसबुक, व्हॉट्सअप, आणि इन्स्टाग्रामवर कोणालाही मेसेज सेंड करता येत नव्हते की कोणाचेही मेसेजेस रिसिव्ह होत नव्हते. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामचे सर्व्हर एकाच वेळी ठप्प होण्याची ही पहिलीच वेळ नाही, या आधीही असे झाले आहे, पण ते काही मिनिटातट दुरुस्त केले जात होते. मात्र यावेळी हे स्लोडाऊन झालेले सर्व्हर दुरुस्त करायला ६ -७ तासाचा वेळ लागला.

मात्र या सहा तासांत फेसबुकचे शेअर्सही 4.9 टक्क्यांनी घसरले आहेत. फेसबुकचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे या सहा तासात फेसबुकला तब्बल सहा अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 45 हजार 555 कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गची (Mark Zuckerberg) जागतिक श्रीमंतांच्या यादीतील स्थानामध्येही घसरण झाली असून तो आता बिल गेट्स यांच्यानंतर पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, एका आठवड्यापूर्वी मार्क झुकरबर्गची संपत्ती ही 140 अब्ज डॉलर्स इतकी होती. मात्र सोमवारी रात्री सर्व्हर डाऊन झाल्यामुळे आता त्याची एकूण संपत्ती 121.6 बिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे. दरम्यान, जुलै महिन्यात फेसबुकचे शेअर्स एक ट्रिलियन डॉलर्स इतक्या मार्केट कॅप व्हल्यूपर्यंत पोहोचलं होतं. आता त्याची किंमत घसरली असून ती 920 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे.

फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या सेवा बंद होण्यामागे कंपनीच्या डोमेन नेम सिस्टीममध्ये बिघाड हे कारण आहे. डोमेन नेम सिस्टमला थोडक्यात DNS असेही म्हणतात. DNS इंटरनेटसाठी फोन बुक सारखे कार्य करते. हे एक साधन आहे जे वेबसाइटचा वेब डोमेन इंटरनेट प्रोटोकॉल आणि आयपी नुसार वेबसाइटचा पत्ता म्हणून आयोजित करते. फेसबुक कंपनीच्या याच DNS मध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी संध्याकाळी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या सेवा अचानक बंद पडल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT