Congress 65 crore Sarkarnama
देश

Congress 65 crore : खात्यातून 65 कोटी कापताच काँग्रेस नेते भडकले; ' हा तर मोदी सरकारचा आर्थिक दहशतवाद...'

Conress Party 65 crore Income Tax News : काँग्रेसच्या खात्यातून 65 कोटी कापले गेले, नेत्यांनी लावला मोदी सरकारवर आरोप...

Chetan Zadpe

Delhi News : केंद्रातील मोदी सरकारने 'आर्थिक दहशतवाद' सुरू केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी आर्थिकदृष्ट्या पक्षाला कमकुवत बनवण्यासाठी पक्षाच्या बँक खात्यातून 65 कोटींहून अधिक रक्कम कापण्यात आल्याचाही दावा काँग्रेस पक्षाने केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनीही भाजप हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला 'हुकूमशाही राजवटीत' बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. (Latest Marati News)

काँग्रेसचे नेते जयराम रमेश म्हणाले, "लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha)काँग्रेसला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माध्यमांशी संवाद साधताना जयराम रमेश म्हणाले, 'काँग्रेसला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा हा प्रयत्न आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. या अशा प्रयत्नातून भाजपकडून काँग्रेसला आगामी निवडणूक सक्षमपणे लढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वेणुगोपाल म्हणाले, 'भाजपने काँग्रेसविरोधात आर्थिक दहशतवाद सुरू केला आहे. हा जो पैसा आहे, तो देशातील सामान्य लोक आणि कामगारांकडून मिळाले आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी प्रमुख विरोधी पक्षांच्या खात्यांवर बंधने टाकण्यात आली आहेत. आमचाच पैसा बँकांमधूनच एकप्रकारे चोरीला जात आहे. विरोधकांना निवडणुकीत अवैध चुकीच्या मार्गाने रोखण्याचा हा प्रयत्न आहे.

काँग्रेस कोशाध्यक्ष अजय माकन यांनी आरोप केला, 'भाजप सरकारने सर्व विरोधी पक्ष आणि काँग्रेसविरोधात 'आर्थिक दहशतवाद' सुरू केला आहे. मोदी सरकारने आमच्या पक्षाच्या खात्यातून पैसे काढून एकप्रकारे ते लुटून घेतले आहे. काँग्रेस पक्ष (Congress Party), भारतीय युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या खात्यातून 65 कोटी 88 लाख 81 हजार 474 रुपये काढण्यात आले आहेत.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT