PM Modi Red Fort speech Independence Day 2025 Sarkarnama
देश

PM Modi Speech 2025: लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन मोदींनी केल्या दोन मोठ्या घोषणा

PM Modi Red Fort speech Independence Day 2025: खाजगी क्षेत्रात पहिली पहिली नोकरी मिळणाऱ्या तरूण किंवा तरूणीला सरकारतर्फे 15 हजार रुपये दिले जाणार असल्याचे मोदींनी सांगितले. संबधीत कंपनींनाही सरकारकडून यासाठी निधी देण्यात येणार आहे.

Mangesh Mahale

थोडक्यात

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून जीएसटी कायद्याचा दिवाळीपर्यंत फेरआढावा घेण्याची घोषणा केली.

  2. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना जाहीर झाली असून, पहिली नोकरी मिळालेल्या युवकांना 15 हजार रुपयांची मदत सरकारकडून मिळणार आहे.

  3. "लखपती दीदी" अभियानांतर्गत आतापर्यंत 2 कोटी महिला लखपती झाल्या असून, 3 कोटींचे उद्दिष्ट गाठण्याचा सरकारचा संकल्प आहे.

Red Fort Independence Day 2025: स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. येत्या दिवाळीत केंद्र सरकारकडून आठ वर्षांपासून लागू असलेल्या जीएसटीचा फेरआढावा घेण्यात येणार आहे. जीएसटी कायद्यात फेरबदल करण्यात येणार आहे. तर युवकांना स्वातंत्र्यदिनी मोदींनी मोठे गिफ्ट दिले आहे.

आजपासून देशात प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना लागू करण्यात आल्याची घोषणा मोदींनी लाल किल्ल्यावरुन केली. या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रात पहिली पहिली नोकरी मिळणाऱ्या तरूण किंवा तरूणीला सरकारतर्फे 15 हजार रुपये दिले जाणार असल्याचे मोदींनी सांगितले. संबधीत कंपनींनाही सरकारकडून यासाठी निधी देण्यात येणार आहे. यामुळे देशातील 3.5 कोटी युवकांना रोजगारांच्या संधी मिळतील, असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.

देशात लखपती दीदींची संख्या वाढल्याचे मोदींनी सांगितले. मोदी सरकारने देशात 3 कोटी महिलांना लखपती करण्याचा पण केला आहे. डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत 2 कोटी महिला लखपती झाल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच पुढील उद्दिष्ट पण गाठण्यात येईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. लखपती दीदीने मोठा रेकॉर्ड केल्याचे कौतुक त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले...

या दिवाळीत तुम्हाला खूप मोठी भेट मिळेल.आम्ही एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. आम्ही नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स करणार आहोत. दिवाळीत ही भेट तुम्हाला मिळेल. कर कमी झाल्याने सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे दैनंदिन वस्तू स्वस्त होतील आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.

'मिशन सुदर्शन चक्र'ची घोषणा

पंतप्रधान मोदींनी देशाच्या सुरक्षेबाबत सुदर्शन चक्र मोहिमेची घोषणा केली आहे.ती अतिशय अचूक असेल. या सुदर्शन चक्राद्वारे देखील आपण अचूक शस्त्रे विकसित करण्यात पुढे जाऊ असा विश्वास व्यक्त करत देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर ही प्रणाली कार्यरत असणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.

मिशन सुदर्शन चक्र ही एक शक्तिशाली शस्त्र प्रणाली आहे. ती केवळ शत्रूच्या हल्ल्याला निष्प्रभ करेलच असे नाही तर अनेक पटींनी प्रत्युत्तर देखील देईल, असे त्यांनी सांगितले. येत्या 10 वर्षांत तिचा विकास होईल. आधुनिक प्रणाली, तिचे संशोधन, विकास आणि उत्पादन देशातच केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

FAQs

Q1. पंतप्रधानांनी लालकिल्ल्यावरून कोणती आर्थिक घोषणा केली?
A1. जीएसटी कायद्याचा दिवाळीपर्यंत फेरआढावा होणार आहे.

Q2. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत काय मिळणार आहे?
A2. पहिली नोकरी मिळालेल्या युवकांना 15 हजार रुपयांची मदत मिळेल.

Q3. या रोजगार योजनेमुळे किती युवकांना फायदा होईल?
A3. सुमारे 3.5 कोटी युवकांना रोजगार संधी उपलब्ध होतील.

Q4. लखपती दीदी योजनेत आतापर्यंत किती महिला लाभार्थी ठरल्या?
A4. आतापर्यंत 2 कोटी महिला लखपती झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT