7th Pay Commission
7th Pay Commission  Sarkarnama
देश

7th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून एक दिलासा, तर एक झटका!

सरकारनामा ब्यूरो

7th Pay Commission Latest News :  केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 2023 हे वर्ष खूप महत्त्वाचे असणार आहे. एकीकडे त्यांच्या वाढलेल्या महागाई भत्त्याने वर्षाची सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर येत्या अर्थसंकल्पात (Budget 2023) त्यांच्यासाठी दोन महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात शक्यता आहे.

३१ जानेवारी रोजी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्तेचा आकडा (AICPI इंडेक्स) येईल. यावरून त्याचा डीए किती वाढला हे कळेल. त्याच वेळी, 1 फेब्रुवारीला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प (अर्थसंकल्प 2023) सादर करतील, तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन घोषणा केल्या जाऊ शकतात. पहिल्या घोषणेने त्यांना थोडा दिलासा मिळू शकतो. त्याचवेळी दुसऱ्या घोषणेमुळे त्यांच्या खिशावरचा थोडासा ताण वाढणार आहे. या दोन्ही घोषणा केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी केल्या जाऊ शकतात.

7 वा वेतन आयोग: वेतन सुधारणा जाहीर होऊ शकते :

पुढच्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरद्वारे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात सुधारणा केली जाईल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, सरकारकडून हे मान्य केले जात नाही. पुढील वेतन आयोगाचीही गरज नाही, असे सरकारचे रोख आहे. सरकारी कर्मचार्‍यांचे पगार दर 10 वर्षांऐवजी दरवर्षी वाढले पाहिजेत. 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापन होण्यासाठी आता फक्त 1 वर्ष उरले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार याआधी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणासाठी नवीन सूत्र आणू शकते. याचा अर्थसंकल्पात समावेश केला जाऊ शकतो, यासाठी वेगळी तरतूद करण्यात येणार आहे.

आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दर 10 वर्षांनी वेतन आयोग स्थापन केला जात होता. 2014 मध्ये 7 वा वेतन आयोग स्थापन करण्यात आला. 7 व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टरच्या आधारे मूळ वेतनात वाढ करून कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली जाते. पण, याचा फायदा उच्चस्तरीय कर्मचाऱ्यांनाच होतो, असा तर्क आहे. आणि खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या पगारात तितकी वाढ होत नाही. त्यामुळे माजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांनी दिलेल्या सूत्रावरच सरकार लक्ष केंद्रित करू शकते.

2016 मध्ये, 7 व्या वेतन आयोगाला मंजुरी देताना ते म्हणाले होते की, "कर्मचार्‍यांच्या पगारात दरवर्षी वाढ करण्याची वेळ आली आहे. याचा फायदा लहान कर्मचाऱ्यांना होणार आहे. नवीन वेतन आयोगाच्या निर्मितीबाबत काम करू नये. दरवर्षी कामगिरीच्या आधारे सरकार आता कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अर्थसंकल्पातील कर्मचाऱ्यांसाठी दुसरी मोठी घोषणा :

अर्थसंकल्प 2023 मध्ये, केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी आणखी एक मोठी घोषणा त्यांच्या हाऊस बिल्डिंग अलाउंस (HBA) बाबत असू शकते. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचारी घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी सरकारकडून आगाऊ रक्कम म्हणून हा भत्ता घेऊ शकतात. या बदल्यात सरकार त्यांच्याकडून व्याज आकारते. सध्या घरबांधणी भत्त्याचा व्याजदर ७.१% आहे. बजेटमध्ये ही वाढ होऊ शकते. कर्मचारी घर बांधण्यासाठी २५ लाख रुपयांपर्यंत ही आगाऊ रक्कम घेऊ शकतो. HBA चा व्याज दर 7.5% पर्यंत सुधारला जाऊ शकतो. त्याच वेळी, 25 लाखांची मर्यादा देखील 30 लाख रुपये केला जाण्याची शक्यता आहे.

7 वा वेतन आयोग: महागाई भत्ता मंजूर केला जाईल :

अर्थसंकल्पानंतर मार्च महिन्यात 7 व्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता मंजूर केला जाईल. वास्तविक, जानेवारी २०२३ च्या महागाई भत्त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. ही सुधारणा जानेवारीमध्ये होईल. मात्र, मार्च महिन्यात मंत्रिमंडळात मंजुरी दिली जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानच सरकार मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत याला मंजुरी देऊ शकते. आतापर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे, डीए वाढीमध्ये 3 टक्क्यांची सुधारणा दिसून येते. मात्र, येत्या ३१ जानेवारीला त्याचे चित्र स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT