8th Pay Commission Sarkarnama
देश

8th Pay Commission : पगार वाढीची प्रतीक्षा संपणार? आजच्या महत्त्वाच्या बैठकीत 8 व्या वेतन आयोगावर शिक्कामोर्तब?

8th pay commission salary hike update 2026 : 8 व्या वेतन आयोगाबाबत आजच्या महत्त्वाच्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासा मिळण्याची अपेक्षा.

Rashmi Mane

केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. पगारवाढीबाबत अनेक दिवसांपासून सुरू असलेली प्रतीक्षा आता संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज झालेल्या बैठकीत 8 व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आज राजधानी दिल्लीत राष्ट्रीय संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या मसुदा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारक संघटनांनी तयार केलेल्या संयुक्त प्रस्तावावर सविस्तर चर्चा होणार होती. यामध्ये वेतनश्रेणी, वार्षिक वाढ, विविध भत्ते आणि इतर सुविधा याबाबत अंतिम भूमिका निश्चित केली जाऊ शकते. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय झाले याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, 8 वा वेतन आयोग वेळेत स्थापन करण्यात आला असून त्याला शिफारसी सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे निर्णय घाईघाईत न घेता सखोल अभ्यासानंतरच अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र, आजच्या बैठकीनंतर पगारवाढीच्या दिशेने स्पष्ट संकेत मिळण्याची शक्यता आहे.

यापूर्वी 12 मार्च रोजी झालेल्या बैठकीत प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यात आली होती. त्या वेळी विविध मुद्द्यांवर मते मांडण्यात आली होती. आता त्या सर्व सूचनांचे एकत्रीकरण करून अंतिम प्रस्ताव तयार केला जाणार आहे, जो पुढे वेतन आयोगाकडे सादर केला जाईल.

सध्या तरी वेतनवाढ लागू होण्याची नेमकी तारीख जाहीर झालेली नाही. मात्र आजच्या बैठकीनंतर या प्रक्रियेला गती मिळेल आणि कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत लवकरच स्पष्ट चित्र समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT