Coromandel Express Accident Sarkarnama
देश

Odisha Train Accidnet: ओडिशा रेल्वे अपघातप्रकरणी मोठी अपडेट; 'सीबीआय'कडून गुन्हा दाखल

Coromandel Express Accident: रेल्वे अपघातानंतर रेल्वे बोर्डाने सीबीआय चौकशीची शिफारस केली होती.

सरकारनामा ब्यूरो

Odisha: ओडिशातील बालासोरमध्ये घडलेल्या भीषण रेल्वे अपघातामध्ये तब्बल 250 पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर जवळपास एक हजार प्रवासी जखमी झाले आहेत. या रेल्वे अपघाताचा तपास आता सीबीआयने आपल्या हाती घेतला आहे. या अपघाताप्रकरणी सीबीआयने मंगळवारी (दि.६ जून) गुन्हा दाखल केला आहे.

याबरोबरच सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे एक पथकही बालासोर येथे पोहोचले असून हा अपघात नेमकी कसा झाला? याला जबाबदार कोण? हा रेल्वे अपघात कुणाच्या चुकीमुळे घडला? यासह अधिक बाबींचा तपास आता सीबीआयकडून करण्यात येणार आहे.

हा रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वे बोर्डाने या प्रकरणाची सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. त्या पार्श्वभूमीवर आता सीबीआय या सर्व घटनेची कसून चौकशी करणार आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही सांगितलं होतं की, या रेल्वे अपघाताच्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून केली जाईल. यामध्ये जो दोषी असेल, त्याला शिक्षा करण्यास सरकार मागेपुढे पाहणार नाही, असं ते म्हणाले होते.

दरम्यान, सीबीआयच्या पथकाने मंगळवारी अपघात घडला तेथील सिग्नलच्या रूम आणि रेल्वे रुळाची पाहणी केली. याबरोबरच रेल्वे स्थानकावर अपघात घडला त्या दरम्यान तैनात असलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांचीही चौकशी सीबीआयकडून केली जाण्याची शक्यता आहे. आज दाखल झालेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आहे.

Edited By-Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT