Queen Elizabeth Passes Away Latest News
Queen Elizabeth Passes Away Latest News Sarkarnama
देश

एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनामुळे 'या' दिवशी भारतात राष्ट्रीय दुखवटा

सरकारनामा ब्यूरो

Queen Elizabeth II death: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 11 सप्टेंबरला भारतात राष्ट्रीय दुखवटा पाळला जाईल. यामुळे या दिवशी राणी एलिझाबेथ यांच्या सन्मानार्थ भारतातील राष्ट्रध्वज अर्धवट राहणार आहे. (Queen Elizabeth II death Latest News)

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्या आमच्या काळातील दिग्गज म्हणून स्मरणात राहतील. त्यांनी आपल्या देशाला आणि लोकांना प्रेरणादायी नेतृत्व दिले. सार्वजनिक जीवनात त्यांनी प्रतिष्ठा आणि सभ्यता दाखवली, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे.

क्वीन एलिझाबेथ द्वितीय मृत्यूच्या दोन दिवस आधी सार्वजनिकपणे दिसल्या होत्या. त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान लिझ ट्रस यांची भेट घेतली होती. राणीने ट्रसला नवीन सरकार स्थापन करण्यास सांगितले होते. राणीचा ट्रसशी हस्तांदोलन करतानाचा फोटोही आहे.

क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांनी 70 वर्षे राज्य केल्यानंतर त्यांनी गुरुवारी (ता.८ ऑगस्ट) स्कॉटलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला. राणीच्या मृत्यूनंतर राजघराण्यात उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मृत्यूनंतर ही संपूर्ण प्रक्रिया कशी पार पाडायची याची एक योजना ब्रिटिश सरकारने बनवली आहे.

दरम्यान, राणीचा अंत्यसंस्कार त्यांच्या मृत्यूनंतर 10 दिवसांनी होणार आहे. तत्पूर्वी, त्यांची शवपेटी त्यांच्या मृत्यूनंतर पाच दिवसांनी लंडन ते बकिंगहॅम पॅलेस ते वेस्टमिन्स्टर पॅलेसमध्ये औपचारिक मार्गाने नेली जाईल. यावेळी लोकांना त्यांचे अंतिम दर्शन घेता येणार असून, हे ठिकाण दररोज 23 तास खुले राहणार आहे. अंत्यसंस्काराचा दिवस राष्ट्रीय दुखवटा दिवस असेल, वेस्टमिन्स्टर अॅबे येथे सेवा आणि यूकेमध्ये दुपारी दोन मिनिटांचे मौन पाळले जाणार आहे. अंत्यसंस्कारानंतर, राणीला विंडसर कॅसल येथील किंग जॉर्ज षष्ठम मेमोरियल चॅपलमध्ये दफन केले जाईल, अशी माहिती मिळाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT