Imran Khan, Death of female journalist Latest News
Imran Khan, Death of female journalist Latest News Sarkarnama
देश

इम्रान खान यांची मुलाखत घ्यायला गेलेल्या महिला पत्रकाराचा रॅलीत मृत्यू ; घटना घडलीच कशी?

सरकारनामा ब्यूरो

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या एका रॅलीत (हकीकी आझादी मार्च) रविवारी (30 ऑक्टोबर) अपघात झाला असून या अपघातामध्ये एका महिला पत्रकाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सदफ नईम असे या महिला पत्रकाराचे नाव असून त्या कंटेनरखाली चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनेनंतर इम्रान खान यांनी आपला मोर्चा थांबवला आहे. (Imran Khan, Death of female journalist Latest News)

नईम या 5 न्यूज चॅनलसाठी काम करत होत्या. पाकिस्तानी माध्यमांनुसार इम्रान खान यांची रॅली लाहोरमधील कामोके ते जीटी रोडकडे निघाली असता हा अपघात घडला आहे. सदफ नईम या इम्रान यांची मुलाखत घेण्यासाठी आल्या होत्या. मात्र, इम्रान यांच्यापर्यंत पोचण्यापुर्वीच हा अपघात झाल्याच सांगण्यात येत आहे. त्या इम्रान यांच्याकडे येत होत्या त्यावेळी इम्रान हे एका कंटेनरवर होते. त्यामुळे त्या त्यांच्या कंटेनर सोबत धावत होत्या. दरम्यान त्या खाली पडल्या आणि कंटेनच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.

झालेल्या या अपघातामुळे इम्रान यांनी तत्काळ कंटेनर थांबवला आणि झालेल्या अपघाताची माहिती घेतली आणि अपघाताची पाहणी केली. यावेळी त्यांनी झालेल्या या घटनेबद्दल शोक व्यक्त करत आपला मोर्चा थांबवला. तिसर्‍या दिवशीच हा मोर्चा गुजदरनवालाला पोहोचणार होता. मात्र, आता या घटनेमुळे तो सोमवारी पोचणार आहे. दरम्यान, खान यांच्या कंटेनरखाली चिरडून पत्रकाराचा मृत्यू झालाच कसा, असा सवालही अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT