तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील बागापूर ग्रामपंचायतीत सरपंचपदाचा निकाल फक्त एका मताने लागला.
मुत्याला श्रीवेधा सरपंच झाल्या असून त्यांचे सासरे अमेरिकेतून खास मतदानासाठी गावी आले होते.
सासऱ्याच्या एका मतामुळेच विजय मिळाल्याने या प्रकरणाची राज्यभर चर्चा होत आहे.
Telanganas sarpanch election News : तेलंगणा राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान एक रंजक घटना समोर आली असून येथे गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीचा निकाल धक्कादायक ठरला आहे. या निवडणुकीत एका मताने महिला उमेदवार विजयी झाली आहे. तसेच निर्णायक मत त्यांचे सासरे यांचेच ठरल्याने याची जोरदार चर्चा आता देशभरात होताना दिसत आहे. ही घटना निर्मल जिल्ह्यातील लोकेश्वर मंडल स्थित ग्राम पंचायत बागापूर येथे घडली आहे.
देशभरातील 12 राज्यांमध्ये मतदार याद्या दुरुस्त करण्यासाठी विशेष सुधारणा (SIR) प्रक्रिया सुरू असतानाच तेलंगणा राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल समोर येत आहे. यादरम्यान एक प्रकरण समोर आले असून जे फक्त एका मताच्या विजयाचे आहे. या सरपंच पदाच्या निवडणुकीत मुत्याला श्रीवेधा या उभरल्या होत्या. तर मतदान करण्यासाठी त्यांचे सासरे मुत्याला इंद्रकरण रेड्डी अमेरिकेहून तेलंगणाला आले होते. आता हे मतच सुनेसाठी वरदान ठरले असून या एका मतांच्या जोरावर त्या विजय झाल्या असून सरपंचही झाल्या आहेत.
वडिलोपार्जित गाव
लोकेश्वरम मंडळातील बागापूर हे गाव मुत्याला इंद्रकरण रेड्डी यांचे वडिलोपार्जित गाव आहे. या गावाच्या ग्रामपंचायत सरपंचाच्या निवडणुकीत त्यांची सून मुत्याला श्रीवेधा उभरल्या होत्या. तर त्यांचे सासरे अमेरिकेला असतात. पण वडिलोपार्जित गावीतील निवडणुक आणि त्यात सून उभरल्याने ते मतदानासाठी गावी आले होते. विशेष म्हणजे रेड्डी स्वतः सरपंच राहिले असून त्यांची भाची देखील 2013 मध्ये सरपंच होती. आता, त्यांची सून निवडणूक जिंकली असून ती गावची सरपंच बनली आहे.
बागापूर गावात एकूण 426 मतदार असून त्यापैकी 378 मतदारांनी मतदान केले. मतमोजणीनंतर श्रीवेधा यांना 189 मते मिळाली. तर दुसऱ्या उमेदवाराला 188 मते. एक मत अवैध आणि नाकारण्यात आले. परंतु श्रीवेधा यांच्या सासऱ्यांचे मत निर्णायक ठरले. आणि फक्त एका मताच्या फरकाने त्या विजयी झाल्या. यामुळे तेथे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान श्रीवेधा यांच्या विजयात कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा मानला जात असून सासऱ्यांचे मत निर्णायक ठरले आहे. यावरून गावकरी म्हणतात की ही लोकशाहीची शक्ती असून एक मत देखील निकाल बदलू शकते. आता हा निर्णय राज्यासह देशभर व्हायरल होत असून लोकांना मतदान करण्यास प्रेरित करत आहे.
काँग्रेसची बाजी
तेलंगणा राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने बाजी मारली आहे. याठिकाणी एकूण 4230 जागांपैकी काँग्रेसने 2425 जागा जिंकल्या आहेत. पक्षाला 57.32 टक्के मते पडली आहेत. तर तेलंगणा राज्य निवडणूक आयोगाने 4230 ग्राम पंचायतीचे निकाल जाहीर केले. त्यात विरोधी पक्षातील भारत राष्ट्र समितीने 1168 जागांवर विजय मिळवला. भाजपाने 189 जागा, सीपीएमने 24 जागा, सीपीआयने 23 जागा तर अपक्ष उमेदवारांनी 401 जागा जिंकल्या आहेत.
1. ही घटना कुठल्या राज्यात घडली आहे?
➡️ तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
2. सरपंचपदाचा विजय किती मतांनी झाला?
➡️ फक्त एका मताने सरपंचपदाचा विजय मिळाला.
3. सरपंच म्हणून कोण निवडून आले?
➡️ मुत्याला श्रीवेधा या सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत.
4. अमेरिकेतून कोण मतदानासाठी आले होते?
➡️ मुत्याला इंद्रकरण रेड्डी, जे सरपंचांच्या सासरे आहेत, ते अमेरिकेतून मतदानासाठी आले होते.
5. हे प्रकरण विशेष का ठरले?
➡️ एका मताने निकाल लागला आणि ते मत अमेरिकेतून आलेल्या सासऱ्याचे असल्याने ही घटना विशेष चर्चेत आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.