Aam Aadmi Party and Congress sarkarnama
देश

Haryana Assembly Election : हरियाणा विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी अन् काँग्रेस एकत्र लढणार!

Mayur Ratnaparkhe

Haryana VidhanSabha Election News : हरियाणामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये जागा वाटपाबाबत एकमत झालं आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्ष एकत्र विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. आम आदमी पार्टीच्या सूत्राने पीटीआयकडे हा दावा केला आहे. तर वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, आम आदमी पार्टी हरियाणात पाच जागांवर निवडणूक लढवण्यास तयार झाली आहे. तर, पक्षाच्या सूत्रांनी हेही सांगितले की, या युतीची घोषणा सोमवारी केली जावू शकते.

आम आदमी पार्टीच्या(Aam Aadmi Party) सूत्राने वृत्तसंस्थेला सांगितले की, काँग्रेसचे दीपक बाबरिया आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांच्यातील चर्चा सकारात्मकरित्या पुढे जात आहे. शक्यता आहे की उद्यापर्यंत या युतीला अंतिम रूप मिळू शकते. आम आदमी पार्टी राज्यात पाच जागांवर निवडणूक लढण्यास तयार झाली आहे.

याआधी आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी म्हटले होते की, काँग्रेस(Congress) आणि त्यांचा पक्ष दोघेही आपल्या वैयक्तिक आकांक्षा बाजूला सारून, हरियाणा निवडणूकीसाठी आघाडी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. चढ्ढा यांनी तेव्हा म्हटले होते की, दोन्ही पक्ष अद्याप तरी एकमतावर पोहचलेले नाहीत, परंतु चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जात आहे आणि यातून चांगल्या निकालाची अपेक्षा आहे. यावेळी त्यांनी हेही सांगितले की, विजयाची स्थिी नसल्यास आम आदमी पार्टी आघाडीसोबत पुढे जाणार नाही.

त्यांनी पीटीआयला सांगितले की, चर्चा सकारात्मक वातावरणात होत आहे. दोन्ही पक्ष वैयक्तिक आणि उमेदवारांच्या आकांक्षा बाजूला ठेवून, एकजुटीली आणि हरियाणतील जनतेच्या मागण्यांना प्राथमिकता देत दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याच्या दिशेने काम करत आहेत. तसेच त्यांनी सांगितले की, प्रत्येक टप्प्यावर जागा वाटपाच्या व्यवस्थेवर भाष्य करता येणार नाही. आघाडी व्हावी अशी दोन्ही पक्षांची इच्छा आणि आशा आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT