Haryana Politics News : हरिणात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. निवडणुकीआधीच आम आदमी पार्टी(AAP)आणि जननाय जनता पार्टी(JJP) या मोठा झटका बसला आहे. पानीपतमध्ये JJPचे उमेदवार रघुनाथ तंवर कश्यप यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर आम आदमी पार्टीचे नीलोखेडी मतदारसंघातील उमेदवार अमरसिंह यांनी काँग्रेस हात हाती घेतला आहे.
जननायक जनता पार्टीचे पानीपत मतदारसंघातील उमेदवार रघुनाथ तंवर कश्यप भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. याचसोबत त्यांनी महीपाल ढांडा यांना समर्थन दिले आहे. भाजपने पानीपत ग्रामीण मतदारसंघात महिपाल ढांडा यांना उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री नायब सैनी, हरियाणा भाजप अध्यक्ष मोहनलाल बडोली यांच्या नेतृत्वात रघुनाथ कश्यप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
महिपाल ढांडा निवडणूक प्रचाराच्या एक दिवस आधी त्यांना आपल्या पक्षात सहभागी करून घेण्यात यशस्वी झाले आहेत. रघुनाथ कश्यप मागील प्रदीर्घ काळापासून भाजप(BJP)मध्येच होते, परंतु उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी जेजेपीमध्ये प्रवेश केला होता. यानंतर जेजेपीने त्यांना पानीपत ग्रामीणमधून उमेदवारी दिली होती.
तर दुसरीकडे हरियाणाच्या करनाल जिल्ह्यातील नीलोखेडी मतदारसंघात खेला झाला आहे. येथे आम आदमी पार्टीचे(AAP) उमेदवार अमर सिंह यांनी काँग्रेच हात हातात घेतला आहे. अमरसिंह प्रतापसिंह बाजवा यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
याशिवाय अमरसिंह यांनी काँग्रेस(Congress)च्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचीही घोषणा केली. आम आदमी पार्टीने करनालच्या नीलोखेडी मतदारसंघातून अमरसिंह यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. मात्र त्यांनी आम आदमी पक्षाची साथ सोडत काँग्रेसचा हात हाती घेतला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.