Gujrat Elections | आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला आहे. केजरीवाल यांनी इसुदान गढवी यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्यांनी 29 ऑक्टोबर रोजी सुरतमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी जनतेलाच मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायचे असल्याचे विचारले होते.
पाटीदार नेते गोपाल इटालिया, काँग्रेस सोडून आम आदमी पार्टीत दाखल झालेले अल्पेश कथेरिया, गुजरातमध्ये आम आदमी पार्टीच्या मुख्यमंत्रिपदासाठी इंद्रनील राज्यगुरू, मनोज सुर्थिया यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र अरविंद केजरीवाल यांनी जनतेने दिलेला कौल मान्य केला. त्या आधारे माजी पत्रकार इसुदान गढवी यांच्या नावाची घोषणा केली.
दरम्यान, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (३ नोव्हेंबर) ही माहिती दिली. 29 ऑक्टोबर रोजी केजरीवाल यांनी जनतेला एसएमएस, व्हॉट्सअॅप, व्हॉईस मेल आणि ई-मेलद्वारे पक्षाशी संपर्क साधावा आणि राज्यात पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असावा, हे सांगण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांना ३ नोव्हेंबरपर्यंत आपले मत देण्यास सांगितले होते. त्याआधारे पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार 4 नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या आप नेत्यांमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया, राष्ट्रीय सरचिटणीस इसुदान गढवी आणि सरचिटणीस मनोज सोराठिया यांचा समावेश आहे. केजरीवाल आज (४ नोव्हेंबर) अहमदाबादमध्ये पत्रकार परिषदेत पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा करतील. 182 सदस्यीय गुजरात विधानसभेसाठी 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. तर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंजाब विधानसभा निवडणूकीत अशाच प्रकारे नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊन भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवारी दिली होती. त्यात ते यशस्वी ठरले होते. पंजाबनंतर त्यांनी गुजरातमध्येही लागू केलेला हा पॅटर्न यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.