Ram Niwas Goel announces retirement from politics : दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. कारण, दोन महिन्यांनंतर होऊ घातलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी, दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे.
गोयल यांनी दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल(Arvind Kejariwal) यांना पत्र लिहून हा निर्णय कळविला आहे. वय झाल्यामुळे आपण निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर पडत असून भविष्यात पक्ष सोपवेल ती जबाबदारी पार पाडू अशी ग्वाही देताना गोयल यांनी केजरीवाल तसेच पक्षाच्या आमदारांनी दिलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले आहे.
आम आदमी पार्टीचे(AAP) प्रमुख केजरीवालांना लिहिलेल्या पत्रात रामनिवास गोयल म्हणाले, मागील दहा वर्षांपासून मी शाहदरा शाहदरा विधानसभेचे आमदार आणि सभापती म्हणून माझे कर्तव्य कुशलतेने पार पाडले आहे. तुम्ही मला कायमच आदर दिलेला आहे, त्यासाठी मी तुमचाा सदैव ऋणी राहीन.
तसेच पक्षाने आणि सर्व आमदारांनी मला खूप आदर दिला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. माझ्या वयामुळे मला निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहयचे आहे. मी तुम्हाला खात्री देतो की, मी आम आदमी पक्षाची पूर्ण तन,मन अन् धनाने सेवा करत राहीन. तुम्ही माझ्यावर जी जबाबदारी द्याल ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन.
गोयल यांचा निर्णय हा आम्हा सर्वांसाठी एक भावुक क्षण आहे. त्यांनी अनेक वर्षे पक्षाला सभागृहात आणि सभागृहााबाहेर योग्य मार्गदर्शन केले. वाढते वय आणि आरोग्याच्या कारणांमुळे निवडणुकीच्या राजकारणापासून दूर होण्याच्या त्यांच्या निर्णयाचा आदर करतो. त्यांच्या अनुभवाची आम्हाला भविष्यात सदैव गरज भासेल, अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी ‘एक्स’वर व्यक्त केली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.