Aamir Khan On Mann Ki Baat : Narendra Modi
Aamir Khan On Mann Ki Baat : Narendra Modi Sarkarnama
देश

Aamir Khan On Mann Ki Baat : 'मन की बात'मध्ये येणार 'परफेक्शनिस्ट' खान; पंतप्रधानांचं तोंडभरून कौतुक..

सरकारनामा ब्यूरो

Aamir Khan On Mann Ki Baat : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. मन की बात या कार्यक्रमातून नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशवासीयांशी संवाद साधतात, असे आमिरने म्हंटले आहे. रविवार ३० एप्रिल रोजी मोदींचा 'मन की बात' हा कार्यक्रम प्रसारीत होणार आहे. यानिमित्त आमिर खान, अभिनेत्री रवीना टंडन एकदिवसीय परिषेदेत सहभागी होणार आहेत. यांच्यासह अनेक कलाकार, खेळाडू, पत्रकार, रेडिओ जॉकी, व्यावसायिक इत्यादी एकदिवसीय परिषदेत सहभागी होत आहेत.

राजधानी दिल्लीमध्ये (दि.२६ एप्रिल बुधवारी) 'मन की बात' या कार्यक्रमाचे 100 भाग पूर्ण झाल्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गजांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

यावेळी बोलताना बॉलीवूड अभिनेता आमिर खानने 'मन की बात' हे जनआंदोलनाचे उदाहरण म्हणून वर्णन केले. 'संवादाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांशी विश्वासार्ह नाते निर्माण केले आहे, असंही आमिर खान म्हणाला.

पंतप्रधानांच्या रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'चा 100 वा भाग 30 एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर हा कार्यक्रम सुरू केला. आमिर खानने म्हंटलं की, "लोकांना मोदींवर विश्वास आहे. लोकांना मोदींवर विश्वास आहे आणि त्यांनी जनतेशी हे नाते निर्माण केले आहे. विश्वास आपोआप निर्माण होत नाही. विश्वास हा कमवावा लागतो, आणि तो पंतप्रधानांनी कमावलेला आहे." 'हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे'

आमिर खानने माध्यमांशी संवाद साधताना म्हंटलं की, "पंतप्रधान मोदी लोकांशी करत असलेल्या संवादाचा हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते. अशा प्रकारे संवादाद्वारे तुम्ही काय पाहताय, भविष्याकडे कसे पाहताय, तुम्हाला लोकांचा पाठिंबा कसा हवा आहे, त्याचं समर्थन कशाप्रकारे आहे, याचा विचार केला जातो."

रेडिओ कार्यक्रमात मोदी फक्त त्यांच्या 'मन की बात' बद्दल बोलतात का, असा प्रश्न विचारला असता, आमीर म्हणाला, "मला वाटते की हे त्यांचे विशेषाधिकार आहे. लोकांना काय म्हणायचे आहे, हे ऐकण्याची पंतप्रधानांची विशिष्ट पद्धत आहे. मला वाटते की, हा एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT