Bangla Sahib Gurdwara case : बंगला साहिब गुरुद्वाऱ्यात कथित गोंधळ घातल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल आणि पक्षाच्या अन्य नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने (डीएसजीएमसी) केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.
‘आप’शी (AAP) संबंधित कार्यकर्ते आणि समर्थकांनी गुरुद्वाऱ्याच्या परिसरात प्रवेश करून आंदोलन सुरू केले. 'आप' कार्यकर्त्यांनी राजकीय घोषणाबाजी करून धार्मिक स्थळाच्या पवित्रतेचा भंग केला. त्यामुळे तेथे गोंधळ आणि अशांतता निर्माण झाली. राजकीय कार्यक्रमासाठी ‘गुरुघरा’च्या पावित्र्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न झाला, असे ‘डीएसजीएमसी’ने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
तसेच, आम आदमी पक्षाचे नेते आणि आमदारांनी या घटनेचे चुकीचे चित्रण करणारे व्हिडिओ समाजमाध्यमांवर (Social Media) प्रसारित केले आणि गुरुद्वारा व्यवस्थापन समितीला दोषी ठरवले, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असून, घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी तक्रारदारांनी दिलेल्या चित्रफितींची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जंतरमंतर येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असताना शनिवारी मोठ्या संख्येने आंदोलक गुरुद्वाराच्या परिसरात जमले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने त्यांचा पुढे जाण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.
आम आदमी पक्षाने हे सर्व आरोप नाकारले आहेत. याउलट, दिल्ली पोलिसांनीच गुरुद्वारामध्ये बूट घालून प्रवेश केला आणि शीख परंपरेचे उल्लंघन केले, असा आरोप 'आप'ने केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दिल्ली पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.