Delhi Political News : Rahul Gandhi Arvind Kejariwal Sarkarnama
देश

Delhi Lok Sabha Election 2024: अखेर ठरलं! दिल्लीत 'आप'ची काँग्रेससोबत 'हात' मिळवणी; 'या'फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

Mangesh Mahale

Delhi News: विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू असताना इंडिया आघाडीत दिल्लीत निवडणुकीसाठी तिढा सुटला आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटप झाल्यानंतर आता दिल्लीत आम आदमी पक्षाचा प्रश्नदेखील सुटला आहे. दिल्लीत दोन्ही पक्षांमध्ये ४-३ फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. (AAP-Congress Finalise Lok Sabha Seat sharing In Delhi)

लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षासोबत काँग्रेसने हात मिळवणी केली आहे. दोघांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. दिल्लीतील 7 जागांपैकी आम आदमी पार्टी 4 आणि काँग्रेस 3 जागा लढवणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आम आदमी पक्ष पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली, पूर्व दिल्ली आणि नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे, तर काँग्रेस ईशान्य दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली आणि चांदनी चौक मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

चंदीगड आणि गोवा या दोन्ही जागांवर काँग्रेस उमेदवार उभे करणार आहे. आता दक्षिण गोव्यातील आपला उमेदवार 'आप' मागे घेणार आहे. हरियाणात काँग्रेस 9 तर आम आदमी पार्टी 1 जागा लढवणार आहे. गुजरातमध्ये आप सर्वाधिक म्हणजे 24 जागा लढवणार आहे,आम आदमी पार्टी 2 जागा लढवणार आहे. 'आप' भरूच, भावनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी दिली.

पंजाबमध्ये स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे, अशी माहिती आम आदमी पक्षाचे नेते संदीप पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. सध्या उत्तर प्रदेश आणि दिल्लीत काँग्रेसची आघाडी निश्चित झाली आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस सपासोबत आणि दिल्लीत आम आदमी पक्षासोबत निवडणूक लढवणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत जागावाटपाची चर्चा काल (शुक्रवारी) झाली होती. मात्र आज जागांची औपचारिक घोषणा करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT