Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal : मुख्यमंत्रिपदाबाबत केजरीवाल घेणार होते मोठा निर्णय; वकिलांनी सल्ला देताच विचार बदलला...

Rajanand More

New Delhi : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून सुटून आल्यानंतर पदाबाबत मोठा निर्णय घेणार होते. पदाचा राजीनामा देण्याबाबत त्यांचा विचार पक्का झाला होता. पण दिल्ली मद्य धोरणा घोटाळा केसमधून निर्दोष मुक्त होऊपर्यंत पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर न बसण्याबाबतही चर्चा सुरू होती.

केजरीवालांनीच रविवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे आयोजित जनता दरबारमध्ये याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. वकिलांच्या सल्ल्यामुळे हा निर्णय न घेतला नाही, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्यावर सर्वात कठोर कायदा पीएमएलए लावला. त्यात जामीनही मिळत नाही. पण केस खोटी असल्याने कोर्टाने आम्हाला सर्वांना जामीन दिला.

आम्हाला भ्रष्टाचारी ठरवण्याचे षडयंत्र मोदींनी केले होते. पण भ्रष्टाचारी हा डाग घेऊन मी जगूच शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या डाग पुसून टाकेपर्यंत म्हणजेच केसमधून निर्दोष सुटेपर्यंत मुख्यमंत्री होणार नाही, असे ठरवले होते. पण वकिलांनी सांगितले की, या केसचा निकाल पुढील आठ-दहा वर्षे लागणार नाही. त्यामुळे मी जनतेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे केजरीवालांनी सांगितले.

उपस्थितांना आवाहन करताना केजरीवाल म्हणाले, मी प्रामाणिक आहे असे तुम्हाला वाटत असेल तरच मला मतदान करू नका. मी अप्रामाणिक वाटत असेल तर झाडूसमोरचे बटन दाबू नका. हा झाडू आस्थेचा प्रतिक आहे. हे निवडणुकीचे चिन्ह नाही.   

आजपासून मी जनतेसमोर जात आहे. आगामी निवडणुकीत जनतेचे समर्थन आणि दिल्लीवासियांचे एक-एक मत माझ्या प्रामाणिकपणाचा पुरावा असेल. माझ्याविरोधात कटकारस्थान करण्यात आले. आम्ही दहा वर्षे प्रामाणिकपणे काम केले. नरेंद्र मोदींना वाटले की, जिंकायचे असेल तर त्यांच्या प्रामाणिकपणावर वार करायला हवा. त्यामुळे त्यांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले. आमचे मंत्री, नेत्यांना जेलमध्ये टाकले, असा आरोप केजरीवालांनी केला.

मला सत्तेची, मुख्यमंत्रिपदाची हाव नाही. मी राजकारणात पैसा कमावण्यासाठी आरोप नाही. मी देशातील राजकारण बदलण्यासाठी आलो असल्याचे केजरीवाल म्हणाले. माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मला भ्रष्टाचारी म्हणतात. पण मी फक्त आदर आणि प्रामाणिकपणा कमावला आहे, असे केजरीवाल म्हणाले.

भ्रष्टाचाराविरोधात सर्वात मोठे अण्णा आंदोलन जंतरमंतरवर सुरू झाले होते. त्यावेळचे सरकारही खूप अहंकारी होते. निवडणूक लढवून दाखवा, जिंकून दाखवा, असे चॅलेंज करत होते. आम्ही निवडणूक लढलो आणि जिंकलोही. प्रामाणिकपणे निवडणूक जिंकली जाऊ शकते, हे जनतेने दाखवून दिले, अशी टीका केजरीवालांनी काँग्रेसवरही केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT