नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास टक्कल करणार, असे म्हणणाऱ्या आपच्या नेत्यानं आपला शब्द फिरवला आहे. मोदी सत्तेत आले पण त्यांना स्पष्टपणे बहुमत मिळाले नाही. मित्रपक्षांसह ते सत्तेत आले आहे, असे म्हणत त्यांनी आता दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यास नकार दिला आहे.
मी माझ्या शब्दावर ठाम आहे. केंद्रात मोदी (Narendra Modi)यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाली, पण मोदी स्वत:च्या हिमंतीवर सत्तेत आले नाहीत. त्यांना आपल्या मित्रपक्षाचा आधार घ्यावा लागला, असे स्पष्टीकरण सोमनाथ भारती (Somnath Bharti) यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिले आहे.
मोदींना (भाजपला) स्पष्ट बहुमत मिळाले असते तर मी टक्कल केले असले, पण तसे झाले नाही म्हणून मी टक्कल करणार नाही, असे सांगून सोमनाथ भारती यांनी आपला शब्द फिरवला.
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर देशातील विविध सर्वेक्षण संस्थांनी एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर केली होती. सर्वेक्षणात एनडीएला अनेक ठिकाणी तर इंडिया अलायन्सला अनेक ठिकाणी धक्का बसल्याचे एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसत होते.
काय म्हणाले होते सोमनाथ भारती
नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार सोमनाथ भारती यांनी दावा केला होता की, "नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन. माझे हे शब्द लक्षात ठेवा. ४ जून रोजी सर्व एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील आणि मोदीजी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत. दिल्लीतील सातही जागा इंडिया आघाडी जिंकेल. मोदीजींच्या भीतीमुळे एक्झिट पोल त्यांना पराभूत झाल्याचे दाखवू देत नाहीत. त्यामुळे आपल्या सर्वांना ४ जूनला निकालाची वाट पाहावी लागेल. जनतेने भाजपाच्या विरोधात प्रचंड मतदान केलं आहे" असं सोमनाथ यांनी म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.