AAP’s Strength in Gujarat : गुजरातमधील एका विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयाचा आनंद आम आदमी पक्षाचे नेते साजरा करत आहेत. अजून त्यांच्या अंगाखांद्यावरील गुलालही उडाला नसेल, तोच पक्षाला मोठा झटका बसला आहे. राज्यातील पक्षाच्या एका आमदाराने तडकाफडकी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांना पक्षाने निलंबित केले.
विसावदार मतदारसंघातून गोपाल इटालिया हे निवडून आले आहेत. त्यांच्या विजयानंतर पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील लोकांना आता बदल हवा आहे, असे विधान केले होते. पण 72 तासांतच त्यांच्याच पक्षाचे बोटाद मतदारसंघाचे आमदार उमेश मकवाना यांनी बंड पुकारले आहे.
मकवाना यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. मात्र, त्यांनी अद्याप आमदारकी सोडलेली नाही. एक कार्यकर्ता म्हणून पक्षात काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मकवाना यांच्याकडे राष्ट्रीय संयुक्त सचिव पद होते. तसेच राज्यातही त्यांच्यावर महत्वाची पदे होती. मकवाना यांच्या या निर्णयामुळे गुजरात आपला धक्का बसला आहे.
मकवाना म्हणाले, मी 20 वर्षे भाजपमध्ये विविध पदांवर काम केलले. त्यावेळी गुजरातमध्ये आपला कोणी ओळखतही नव्हते. भाजप सोडून मी आपमध्ये आलो. पण आपही भाजपच्या वाटेवर चालले आहे. इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सिध्दांतांपासून भटकवले जात आहे. त्यामुळेच मी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
मी मतदारसंघातील लोकांशी चर्चा करून स्वतंत्र पक्ष बनविण्याबाबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मकवाना यांनी पदांचा राजीनामा दिल्यानंतर पक्षानेही मोठे पाऊल उचलत पाच वर्षांसाठी त्यांना पक्षातून निलंबित केले. पक्षाचे नेते ईसुदान गढवी म्हणाले, पक्षविरोधी तक्रार आल्यानंतर त्यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. मतदारसंघातील जनतेतूनही अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे पक्षाने हा निर्णय घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.