APP Shelly Oberoi elected mayor of Delhi  Sarkarnama
देश

Delhi Mayor Election : दिल्लीवर सलग दुसऱ्यांदा APP चा झेंडा ; महापौरपदी शैली ओबेरॉय बिनविरोध ; भाजपच्या शिखा रॉय...

APP Shelly Oberoi elected mayor of Delhi : शिखा रॉय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शैली ओबेरॉय यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Delhi Mayor Election 2023: आम आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय या पुन्हा एकदा महापौरपदी विराजमान झाल्या आहेत.

भाजपच्या उमेदवार शिखा रॉय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शैली ओबेरॉय यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानंतर उपमहापौरपदाची निवडणुकही बिनविरोध झाली आहे.

उपमहौपारपदासाठी भाजपकडून सोनी पांडे यांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाचे मोहम्मद इकबाल यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. शैली ओबेरॉय या सलग दुसऱ्यांदा महापौर झाल्या आहेत.

शैली ओबेरॉय यांनी गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या रेखा गुप्ता यांचा ३४ मतांनी पराभव केला होता. शैली ओबेरॉय यांना गेल्या निवडणूक १५० मते मिळाली होती, रेखा गुप्ता यांना ११६ मते मिळाली होती. दिल्ली महापौरपदासाठी दरवर्षी निवडणूक होते.

दिल्ली महापालिकेसाठी २५० जागा आहेत, यात भाजप १०४, आम आदमी पक्ष १३४ असे बलाबल आहे. गेल्या वेळी महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीपूर्वी दोन नगरसेवक भाजपमध्ये सामील झाले होते. त्यामुळे भाजप नगरसेवकांची संख्या १०६ झाली होती. त्यानंतर दोन दिवसापूर्वी आम आदमी पक्षातील एक नगरसेविक भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची संख्या १०७ झाली आहे.

कोण आहेत शैली ओबेरॉय

शैली ओबेरॉय या प्राध्यापिका आहेत. त्या दिल्ली विद्यापीठात व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत. इंडियन कॉमर्स असोसिएशनच्या त्या आजीवन सदस्याही आहेत. त्याचबरोबर, त्यांनी पीएच.डी. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली आहे.तर विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून पीएचडी पूर्ण केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT