NCP Chief Sharad Pawar Latest Marathi News Sarkarnama
देश

मोठी घडामोड : राष्ट्रपतीपदासाठी 'आप'चा शरद पवारांना पाठिंबा? 'युपीए'ची मोर्चेबांधणी सुरू

राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपसह युपीएतील सर्व पक्षांची खलबतं सुरू झाली आहेत.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडीकडून (UPA) राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव निश्चित झालं तर आमचं त्यांना समर्थनच राहील, असं वक्तव्य महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी केलं आहे. त्यानंतर आता पवारांना आम आदमी पक्षाचाही पाठिंबा असल्याचे समजते. त्यामुळे युपीएकडून पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. (Sharad Pawar Latest Marathi News)

महाराष्ट्रातील व्यक्ती जर देशाचे राष्ट्रपती होत असतील, त्यासाठी त्यांचे नाव पुढे आले तर महाराष्ट्र काँग्रेस त्यांच्याबरोबर असेल, असं पटोले म्हणाले होते. पण काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह वरिष्ठ नेते व युपीएतील इतर पक्षांकडून अद्याप राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही. पुढील दोन दिवसांत याबाबत बैठक होणार असून त्यासाठी चाचपणी सुरू करण्यात आली आहे. (APP will support NCP Chief Sharad Pawar for presidential Election)

युपीएमध्ये आपचा सहभाग नसला तरी पवारांचे नाव पुढे आल्यास त्याला पाठिंबा दिला जाऊ शकतो, असे आपमधील सुत्रांनी सांगितल्याचे वृत्त 'इंडिया टू़डे'ने दिले आहे. आपचे खासदार संजय सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईतील त्यांच्या घरी भेट घेतली होती. राष्ट्रपती निवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

आपकडून अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण पवारांना पाठिंबा देण्यावर पक्षात एकमत असल्याचे सांगितले जात आहे. आपची दिल्लीसह पंजाबमध्येही सत्ता आहे. त्यामुळे विरोधकांना आपची साथ मिळणे, महत्वाचे आहे.

दरम्यान, पवार यांना शिवसेनेसह तृणमूल काँग्रेस, डीएमके, डावे पक्ष व अन्य काही पक्षांचा पाठिंबाही मिळू शकतो. त्यामुळे आता युपीएच्या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे लक्ष लागले आहे. तर भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. एनडीएसह युपीएतील घटक पक्ष व इतर पक्षांशी चर्चा करून सर्वानुमते उमेदवार ठरविण्यासाठी हे दोन चर्चा चर्चा करणार आहेत.

राष्ट्रपती पदासाठी निवडणूक

नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत- 29 जून

नामांकन अर्जांची छाननी- 30 जून

नामांकन परत घेण्याची तारीख- 2 जुलै

मतदान- 18 जुलै

मतमोजणी- 21 जुलै

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT