Abhijeet Dipke Sarkarnama
देश

Abhijeet Dipke : लाठीचार्ज, अश्रुधुराचा मारा करत विद्यार्थ्यांना उचलणाऱ्या पोलिसांवर अभिजित दिपकेंचा हल्लाबोल; 'RSS ची चड्डी...'

abhijeet dipke Criticizes Delhi Police Over Student Detentions : नवी दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद मार्ग परिसरात २० जुलै २०२६ रोजी 'कॉकरोच जनता पार्टी' आणि विद्यार्थ्यांच्या निदर्शनादरम्यान पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर तीव्र लाठीचार्ज केला.

Aslam Shanedivan

Delhi Police : नवी दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद मार्ग परिसरात २० जुलै २०२६ रोजी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी तीव्र लाठीचार्ज केला. तसेच अश्रुधुराचा मारा करत 'कॉकरोच जनता पार्टी' आणि विद्यार्थी आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी अनेकजण जखमी झाले. ज्यामुळे आता देशभरात संतापाची लाट उसळली असून दिल्ली पोलिसांचा निषेध केला जात आहे. अशातच आता 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर जहरी टीका करत थेट इशारा दिला आहे.

त्यांनी दिल्ली पोलिसांवर रोष व्यक्त करत, दिल्ली पोलिसांची जगभर छी थू होत असून त्यांच्यामुळे देशाची बदनामी होत आहे. जगाला पोलिसांचे खरे रूप दिसत असून ते १२-१२ वर्षांच्या मुलींची डोकी फोडत आहेत. दिल्ली पोलिस त्यांच्या लाठ्यांना खिळे मारून विद्यार्थ्यांना लक्ष्य करत असून मुलींचे कपडे फाडत आहेत.

या पोलिसांना लाज कशी वाटत नाही, इतके कसे 'खुशामतखोर' झाले आहेत. याआधी आपण खूप मोठे-मोठे खुशामतखोर बघितले आहेत. पण दिल्ली पोलिसांपेक्षा मोठा कोणीच बघितला नाही. सगळ्या सीमा दिल्ली पोलिसांनी पार केल्या. थोडी तरी लाज बाळगा. आपली नाही तर त्या वर्दीची तरी, असे म्हणत अभिजित दिपके यांनी दिल्ली पोलिसांना लक्ष्य केले आहे.

जर दिल्ली पोलिसांना भाजपच्या नेत्यांची 'खुशामतगिरी' करायचीच असेल, तर नोकरी सोडून द्या. भाजपच्या कार्यालयावर जाऊन सांगा की तुम्ही देखील चौकीदार आहात. हीच तुमची किंमत असून यापेक्षा अधिक आपली नाही. तुम्ही याच लायक आहात. दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चेहरे बघितले तरी आता किळस येतो, असा हल्लाबोल करत पोलिस असे कसे विद्यार्थ्यांना मारू शकतात, असा सवाल केला आहे. तर एवढे करूनही यांचे मन अजून भरलेले नाही. आताही ते विद्यार्थ्यांना आपले लक्ष्य करत आहेत. लाठीचार्जबरोबरच अश्रुधुराचा मारा करत आहेत. विद्यार्थ्यांना ताब्यात घेत आहेत.

निझामुद्दीन, बदरपूर आणि दिल्ली येथे विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले जात आहे. असे करून सगळ्या देशातील आरोपींना ताब्यात घेतले का? दिल्ली पोलिस इतकी नाटकी आहेत की त्यांची अशी नाटकी वृत्ती अत्याचाराच्या प्रकरणातदेखील पाहिली नाही. जेव्हा महिलांच्या सुरक्षेचा विषय येतो, तेव्हा हे चहा पित बसतात, पोलीस ठाण्यातून बाहेरदेखील पडत नाहीत. कोणी महिला गेलीच तक्रार द्यायला, तर हे आमच्याकडे नाही, त्या ठाण्याचे असल्याचे सांगितले जाते.

पण आता मात्र येथे जे विद्यार्थी आंदोलन करत आहेत, हेच पोलीस त्यांच्या घरी जात आहेत. अशा या वर्तणुकीने दिल्ली पोलिसांनी आपली इज्जत घालवून घेतली. सोबतच देशालाही बदनाम केले. यामुळे आता हा शेवटचा इशारा असेल. जर दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेणे बंद केले नाही, तर आम्ही दिल्ली पोलिसांच्या हेडक्वार्टरवर आंदोलन करू. मला टायफॉइड झाला असून अशातही येईन. आणि तोपर्यंत तिथेच बसेन, जोपर्यंत एक-एक विद्यार्थ्याला सोडून दिले जाणार नाही.

आम्ही येथे गेल्या एक महिन्यापासून शांतपणे आंदोलन करत असून, तुम्ही किती त्रास दिलात ते आम्ही बघत आहोत. आमचे पाणी तुम्ही रोखले, जेवण रोखले, इतकेच काय तर तुम्ही जी मुले येथे पाणी वाटत होती, त्यांच्याही घरावर छापेमारी करण्यात आली. तुम्हाला तर पोलीस म्हणणेही त्या वर्दीची बदनामी आहे. यामुळे तुम्ही वर्दी उतरवून आरएसएसची चड्डी घाला... तीच तुम्हाला शोभून दिसेल. त्या वर्दीचा अपमान न करता आरएसएसची चड्डी घाला, काठी कशीही आहेत तुमच्या जवळ आता आरएसएसची चड्डी घाला. तुमच्यासाठी हेच योग्य असून पोलिस म्हणण्याइतकी तुमची लायकी नाही, अशी घणाघाती टीका अभिजित दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT