Abhijeet Dipke warning to Modi government Sarkarnama
देश

Abhijeet Dipke Warning : पहिली झाली, दुसरी झाली, आता तिसरी चूक करू नका अन्यथा... : अटकेची कुणकुण लागताच अभिजीत दिपकेंचा मोदी सरकारला इशारा

Abhijeet Dipke warned the government at Jantar Mantar: "आज रात्री आमच्या टीमला अटक होऊ शकते. आम्ही इथे शांततेत बसलो आहे. शांततेत हे आंदोलन सुरू आहे. आम्ही महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या मार्गावर चालणारे लोक आहे. तुम्हाला संविधानाची काय अडचण आहे?"

Jagdish Patil

Abhijeet Dipke statement on possible arrest: कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी जंतरमंतरवरून सरकारला मोठा इशारा दिला. "सरकारने आधीच दोन चुका केल्या आहेत. आता तिसरी चूक करू नका अन्यथा संपूर्ण देशभरात हे आंदोलन आणखी मोठं होईलं", असा इशारा दीपके यांनी दिला आहे.

जंतरमंतरवर जमलेल्या आंदोलकांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले, "आज रात्री कॉकरोच जनता पार्टीच्या टीमला अटक होऊ शकते. मात्र, सरकारने ही चूक करू नये, अन्यथा हे आंदोलन आणखी मोठं होईलं.

अभिजीत दीपके नेमकं काय म्हणाले?

अभिजीत दीपके यांनी सरकारला याआधी त्यांनी केलेल्या दोन चुकांची आठवण करून दिली. ते म्हणाले, "आज रात्री आमच्या टीमला अटक होऊ शकते. आम्ही इथे शांततेत बसलो आहे. शांततेत हे आंदोलन सुरू आहे. आम्ही महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या मार्गावर चालणारे लोक आहे. तुम्हाला संविधानाची काय अडचण आहे? तुम्ही आम्हाला अटक कशासाठी करणार आहात? असा सवाल दीपके यांनी उपस्थित केला.

तर सरकारने सोनम सरांना इथून बळजबरीने नेलं ही पहिली चूक केली. त्यानंतर सरकारने लहान मुलींची डोकी फोडली, पुरूष पोलिसांनी मुलींची कपडे फाडून दुसरी चूक केली. मुलींना मारहाण केल्यानंतर हे देशभरात आंदोलन पोहोचलं. त्यानंतर आता आम्हाला अटक करून तिसरी चूक करू नका, अन्यथा देशभरात हे आंदोलन मोठं होईलं, असं दीपके म्हणाले.

शिवाय त्यांनी उपस्थित आंदोलकांना मोठं आवाहन केलं, "आमच्या टीमला अटक केली तर हे आंदोलन पुढे नेण्याची तयारी तुमची आहे. मात्र, हे आंदोलन शांततेत करा. देशाच्या कोनाकोपर्‍यात हे आंदोलन पोहोचवा", असं ते म्हणाले. त्यामुळे आता सरकारने खरंच दीपके यांना आज अटक केली तर आंदोलनाची पुढील दीशा नेमकी कशी असणार आणि आणखी हे आंदोलन पेटणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT