MP Sanjay Raut alleged that Abhijeet Dipke met Prime Minister Narendra Modi in the United States. The claim has sparked political discussions across Maharashtra. Sarkarnama
देश

Abhijeet Dipke : अभिजीत दिपके अन् PM मोदींमध्ये अमेरिकेत मिटींग; त्यांच्या भेटीनंतरच दिपके भारतात आला, दोघांचे फोटोही बघितले..., बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Abhijeet Dipke met Narendra Modi in the US : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीकडून दिल्लीतील जंतर-मंतर इथे आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर आज पुण्यात देखील या दिपके यांच्या उपस्थित आंदोलन केलं जाणार आहे.

Jagdish Patil

Abhijeet Dipke India return after Modi meeting: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत मिटींग झाली आणि त्या मिटींगनंतरच दिपके भारतात आल्याचा खळबळजनक दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

शिवाय या भेटीचे फोटो देखील आपल्याला एका व्यक्तीने पाठवल्याचा दावा देखील राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आता खरंच अभिजीत दिपके आणि भाजप यांचं काही कनेक्शन आहे का याबाबतच्या चर्चांना सुरू झाल्या आहेत.

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीकडून दिल्लीतील जंतर-मंतर इथे आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर आज पुण्यात देखील या दिपके यांच्या उपस्थित आंदोलन केलं जाणार आहे. मात्र, यापूर्वीच संजय राऊत यांनी दिपके आणि मोदी यांची भेट झाल्याचा दावा केला.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

माध्यामांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "भारतातील विरोधी पार्टी सरकारविरोधात लढण्यासाठी सक्षम असल्याचंही म्हटलं आहे. काँग्रेसने देशभरात नीटच्या मुद्द्यावर आंदोलनं केली पण याची दखल माध्यमांनी घेतली नाही."

तसंच यावेळी राऊतांनी अभिजीत दिपके आणि मोदींमध्ये झालेल्या मिटींगचे फोटो देखील आपल्याला एका व्यक्तीने पाठवल्याचा दावा केला. शिवाय मोदींच्या भेटीनंतर दिपके भारतात आल्याचं लोक बोलत आहेत. याबाबतची माहिती आम्ही घेऊ. मात्र, इथून पुढे आम्ही आगीत उड्या मारणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT