Abhijit Dipke : दिल्लीतील जंतर मंतरवर मागील 21 दिवासांपासून उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांचे आंदोलनावर पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईमध्ये वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने उचलून घेऊन गेले. तर, अभिजित दिपके यांना पोलिसांनी मारहाण केली. तसेच, आंदोलकांना देखील पोलिसांनी मारहाण करत फरपटत नेल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अभिजित दीपके यांनी सांगितले की, 'पोलिसांनी शिवीगाळ करत मला मारहाण केली. हे दिल्ली पोलिस नाही तर आरएसएसचे गुंडे आहेत. देशात लोकशाही शिल्लक राहिली नाही, मोदी हे हुकमशाह आहेत.सोनम वांगचुक यांना कुठे घेऊन गेले याची मला कल्पना नाही.'
आंदोलकांनी आरोप केला की, पोलिसांनी त्यांचे फोन हिसकावले, काही आंदोलकांना मारहाण करत फरपटत नेले. आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, सोनम वांगचुक यांना सफरगंज रुग्णालयात पोलिसांनी दाखल केल्याची माहिती आहे.
दीपके यांच्या झालेल्या मारहाणीनंतर तसेच सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला. ते म्हणाले, 'भारतातील लोकशाही बळाचा वापर करून निर्लज्जपणे पायदळी तुडवली जात असल्याचे जग पाहत आहे. एखाद्या अकार्यक्षम मंत्र्याविरुद्ध विद्यार्थ्यांकडून केल्या जाणाऱ्या शांततापूर्ण निदर्शनांनाही आता सहन केले जात नाही.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.