Abhishek Banerjee, Mahua Moitra News Sarkarnama
देश

Abhishek Banerjee News : महुआ मोईत्रांसाठी अभिषेक बॅनर्जी मैदानात; 'महुआ राजकारणाच्या बळी ठरल्या...'

Mahua Moitra Cash For Query : पश्चिम बंगालच्या खासदार महुआ मोईत्रा कथित 'कॅश फॉर क्वेरी' केसमुळे अडचणीत आल्या आहेत.

Amol Jaybhaye

New Delhi News : पश्चिम बंगालच्या खासदार महुआ मोईत्रा कथित 'कॅश फॉर क्वेरी' केसमुळे अडचणीत आल्या आहेत, तर सीएम ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी आता महुआ मोईत्रा यांचा बचाव केला आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मौन बाळगले असताना अभिषेक बॅनर्जी यांनी महुआ या राजकारणाचा बळी ठरल्या असल्याचे म्हटले आहे.

महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्यावर उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. त्याच्याविरोधात लोकसभेच्या 'एथिक्स कमिटी' कडे तक्रार केली आहे. या प्रकरणी आता एथिक्स कमिटीने 500 पानी अहवालही सादर केला आहे.

दरम्यान, महुआ मोईत्रांच्या बचावासाठी अभिषेक बॅनर्जी पुढे आल्या आहेत. महुआ राजकारणाचा बळी ठरल्याचे त्यांनी म्हटले. अभिषेक बॅनर्जी पक्षाचे सरचिटणीस आहेत. अशा स्थितीत तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्ष महुआ मोईत्रा यांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची भाषणबाजी टाळत असला तरी तो महुआ यांच्या सोबत असल्याचे दिसून येत आहे.

'महुआ स्वतःची लढाई लढण्यास सक्षम आहेत,' असेही बॅनर्जी म्हणाले. भाजपने (BJP) टीएमसी नेत्यांना लक्ष्य केल्याचा आरोप करत बॅनर्जी म्हणाले, "मला वाटते की ही केंद्र सरकारची चाल आहे आणि मी एथिक्स कमिटीचा अहवाल वाचला आहे." त्याच्याविरोधात चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. हा तपासाचा विषय आहे, मग त्यांना संसदेतून हटविण्याची शिफारस का करण्यात आली, असा सवाल त्यांनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT