Delhi University Election 2026 
देश

DU Election: दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा दणदणीत विजय! काँग्रेसचा धुव्वा, पण 'या' अपक्ष उमेदवाराची होतेय सर्वाधिक चर्चा

DU Election: दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थीसंघाच्या निवडणुकीत एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च कामगिरी केली. तर काँग्रेसप्रणित एनएसयुआयचा पूर्णतः धुव्वा उडाला.

Amit Ujagare

DU Election: दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अर्थात एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च कामगिरी केली आहे. तर काँग्रेसप्रणित नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया अर्थात एनएसयुआयचा पूर्णतः धुव्वा उडाला. पण या निवडणुकीचं विशेष म्हणजे यावेळी विजयी झालेल्या एका अपक्ष उमेदवाराचीच जास्त चर्चा सुरु आहे.

काय लागला निकाल?

दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थी संघाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत एबीव्हीपीनं ३ जागांवर विजय मिळवला यामध्ये अध्यक्ष (यश डबास), सचिव (रिया छाबडी), संयुक्त सचिव (लक्षराज सिंह) या जागांवर विजय मिळवला. तर उपाध्यक्षपदी अपक्ष उमेदवार दीपांशू शौकीन यानं विजय मिळवला. यामध्ये एनएसयूआयला एकही जागा मिळाली नाही.

सर्वाधिक चर्चा अपक्ष उमेदवाराची

या निवडणुकीत उपाध्यक्षपदी निवडून आलेल्या दीपांशू शौकीन या अपक्ष उमेदवाराची सर्वाधिक चर्चा सुरु आहे. कारण दीपांशूनं या निवडणुकीसाठी संपूर्ण विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पायात चप्पल न घालताच फिरुन प्रचार केला होता. इतकंच नव्हे निवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना मतमोजणी केंद्राजवळही तो अनवाणीच फिरत होता. पण अखेर विजय मिळवत उपाध्यक्षपदासाठी सर्वाधिक ३०,६३४ मतांनी त्यानं विजय मिळवला.

खरंतर २१ वर्षीय दीपांशू शौकीन हा काँग्रेसप्रणित एनएसयूआयचा सदस्य आहे. पण संघटनेनं त्याला या निवडणुकीसाठी तिकीट दिलं नाही. त्यामुळं त्यानं संघटनेला रामराम केला आणि आपला अपक्ष अर्ज भरला. मतमोजणीच्या १७व्या फेरीनंतर तो उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत विरोधकांपेक्षा कितीतरी पुढे होता. त्याला या फेरीमध्ये २६,३४१ मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या एबीव्हीपीच्या इशू मौर्यला १३,६५५ मतं मिळाली. एनएसयूआयचे उमेदवार छत्रथ हा ३,६९८ मतांनी खूपच मागे होता. दीपांशूनं शहीद भगतसिंग कॉलेजमधून बीएची डिग्री घेतली आहे. आता तो एमए करत आहे.

दिल्ली विद्यापीठाचं होस्टेल हा प्रचाराचा मुख्य मुद्दा

विद्यार्थ्यांच्या राहण्याचा प्रश्न गंभीर असल्यानं आणि हॉस्टेल बिल्डिंगची अवस्था अत्यंत बिकट असल्यानं हाच मुद्दा यंदाच्या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा ठरला. याच महिन्यात ६ सप्टेंबर रोजी सत्य निकेतन ही एक खासगी पेईंग गेस्ट इमारत कोसळून दिल्ली विद्यापीठाच्या ५ विद्यार्थ्यांसह ७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं विद्यार्थ्यांसाठी पुरेशी आणि सर्व आवश्यक सुविधांनी सुसज्ज हॉस्टेल इन्स्फ्रास्ट्रक्चर तयार करणे हाच प्रचाराचा प्रमुख मुद्द ठरला. यावरुन दीपांशू शौकीनं अनवाणी फिरत विद्यार्थ्यांचा विश्वास कमावला आणि निवडणुकीत विजय मिळवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT