Malvika Sood
Malvika Sood Sarkarnama
देश

सोनू सूदच्या बहिणीची राजकारणात उडी; काँग्रेसमध्ये लागणार लॉटरी

सरकारनामा ब्युरो

चंडीगड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये (Punjab) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेता सोनू सूदच्या (Sonu Sood) बहिणीने सोमवारी राजकारणात (Politics) प्रवेश केला. मागील वर्षीच सूद यांनी बहीण मालविका सूद (Malvika Sood) या विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं होतं. पण त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत स्पष्ट करण्यात आलं नव्हतं.

मालविका या काँग्रेस (Congress) किंवा आपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर त्यांनी काँग्रेसचा हात हातात घेतला आहे. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू (Navjot Singh Sidhu) यांच्या उपस्थितीत त्यांनी याबाबत घोषणा केली. त्यांना मोगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून तिकीट दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मालविका यांच्या आपसोबतही अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. पण त्यातून काहीच हाती लागले नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री चन्नी यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी त्या काँग्रेसमध्ये दाखल होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानुसार निवडणूक जाहीर होताच मालविका यांनी आपली भूमिका स्पष्ट करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, मागील वर्षी मोगा येथील निवासस्थानी सोनू सूदने पत्रकार परिषदेत त्याची बहीण मालविका सूद या उमेदवार असतील, असे त्यांनी स्पष्ट केलं होतं. कोरोना काळामध्ये सूद याने अनेकांना मदतीचा हात पुढे करत लोकांची मनं जिंकली आहेत. विशेषत: स्थलांतरित मजूरांसाठी त्याने मोठं कामं केलं आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांच्या आरोग्यविषयक अडचणी सोडवण्यासाठी त्याने मोठी आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून तो सतत प्रकाशझोतात आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी त्याने दिल्ली येथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती.

काही दिवसांपासून सोनू सूद हा काँग्रेसच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात होते. तसेच त्याचा माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्यासोबतचा फोटोही व्हायरल झाला होता. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाची (Income Tax Department ) टीम काल सोनू सूदच्या घरी गेली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी विभागाने सोनू सूदशी संबंधित सहा ठिकाणच सर्वे केला होता. मात्र कोणत्याही वस्तू वा कागदपत्र जप्त करण्यात आली नव्हती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT