Jacqueline Fernandez Money Laundering Case: अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला शनिवारी पटियाला हाऊस कोर्टाने दिलासा दिला आहे. जॅकलीन सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात कोर्टात हजर झाली होती. यावेळी कोर्टाने जॅकलीनला दिलासा देत पुढील सुनावणीपर्यंत तिच्या अटकेला स्थगिती दिली आहे. येत्या10 नोव्हेंबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. जॅकलीनच्या जामीन अर्जावर न्यायालयाने ईडीला उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. पण ईडीने (ED) उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे.
काय आहे प्रकरण?
200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. सुकेशने अनेक लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 17 ऑगस्ट रोजी ईडीने त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. ज्यात 200 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात जॅकलीनच्या विरोधातही अनेक पुरावे मिळाले होते. या प्रकरणात अनेक साक्षीदार आणि पुरावे आढळून आल्याने न्यायालयाने या दोघांनाही समन्स बजावले होते. जॅकलीन मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकल्यानंतर तिच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला होता.
या प्रकरणी ईडीने जॅकलिनची अनेकदा चौकशीही केली. तिला सुकेशसोबत लग्नही करायचे होते. याशिवाय जॅकलीन फर्नांडिसची दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हेगार शाखेने 15 तास चौकशी केली.
जॅकलीन ची स्टायलित्यांच्याशी संबंध तोडल्याचे लिपक्षीने सांगितले होते. इतकेच नव्हे तर सुकेशने तिला जॅकलीन साठी कपडे खरेदी करण्यासाठी ३ कोटी रुपये दिल्याचेही तिने सांगितले होते. सुकेशकडून मिळालेली संपूर्ण रक्कम लिपाक्षीने जॅकलीनसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी खर्च केली असल्याचेही लिपाक्षीने यावेळी सांगितले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.