adar poonawala takes covishield vaccine to endorse safety and efficacy
adar poonawala takes covishield vaccine to endorse safety and efficacy 
देश

असाही आदर्श...अदर पूनावालांनी आधी केलं अन् मग सांगितलं..!

सरकारनामा ब्युरो

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोरोना लसीकरण मोहिमेला आज देशात सुरवात झाली. मात्र, कोरोना लशीच्या सुरक्षिततेवरुन मोठी चर्चा सुरू आहे. या चर्चांना पूर्णविराम मिळावा यासाठी सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी आज लस घेतली. सामान्य नागरिकांमध्ये लशीच्या सुरक्षिततेविषयी विश्वास जागृत व्हावा, असा यामागे उद्देश होता.  

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास आज देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले. या वेळी मोदींनी देशवासीयांशी संवाद साधला. लस घेतल्यानंतरही काळजी घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे, असल्याचा संदेश मोदींनी दिला. तीन कोटी लोकांना लस मोफत देणार येणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींना दुसऱ्या टप्यात लस दिली जाणार आहे.

मोदी म्हणाले की,  खूप दिवसापासून कोरोना लशीची प्रतिक्षा होती. प्रथम कोरोना योद्धांना लस देण्यात येणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींना दुसऱ्या टप्यात लस दिली जाणार आहे. लस घेतल्यानंतरही काऴजी घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे. लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना मदत देण्यात येत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खर्च सरकार उचलणार आहे. कोरोना काळात सरकारने अर्थव्यवस्थेपेक्षा लोकांच्या जीवनाला महत्व दिले.'' 

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. कोरोना लशीच्या सुरक्षिततेविषयी वेगवेगळी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी पहिल्यांदा स्वत: लस घेतली आहे. 

याबाबतचा व्हिडीओ पूनावाला यांनी ट्विट केला आहे. यात ते लस टोचून घेताना दिसत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मी कोरोना लस घेत आहे. कोरोनाविरोधात आघाडीवर असणारे कर्मचारी आणि आरोग्यसेवकांना ही लस देण्यात येत आहे. तिची सुरक्षितता आणि परिणामकारकता समोर यावी, हा माझा हेतू आहे. 

जगातील सर्वांत मोठ्या कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला असून, त्यांना यात यश मिळावे, अशा शुभेच्छा मी देतो. या ऐतिहासिक मोहिमेत कोव्हिशिल्डचा समावेश आहे, ही बाब माझ्यासाठी अभिमानाची आहे. यातून या लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता सिद्ध होत आहे. आरोग्य सेवकांसोबत आज मी लस घेऊन या मोहिमेत सहभागी झाले आहे, असे पूनावाला यांनी म्हटले आहे. 

केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. या आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यानंतर ही लस 50 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणार आहे. यात मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांचा समावेश असेल. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT