Tomato Flu in Kerala
Tomato Flu in Kerala  Sarkarnama
देश

कोरोनानंतर आता ‘टोमॅटो फ्लू’ची धास्ती! केरळमध्ये लहान मुलांना संसर्ग

सरकारनामा ब्युरो

तिरुअनंतपुरम : देशभरात कोरोना (Covid-19) महामारीने थैमान घातल्यानंतर आता एका नवीन आजाराने डोके वर काढले आहे. कोरोनाची साथ कायम असतानाच केरळमध्ये (Kerala) टोमॅटो फ्लू (Tomato Flu) या नव्या आजाराचा शोध लागला आहे. राज्यातील अनेक भागात या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. (Tomato Ful News Updates)

राज्यातील अनेक भागात या आजाराची लक्षणे असलेली लहान मुले आढळत आहे. राज्यभरात पाच वर्षांपेक्षा कमी वयाची ८० मुलांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. तापामुळे आजारी असलेल्या सर्व रुग्णांची टोमॅटो फ्लूच्या चाचण्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार तापाचे रुग्ण आढळल्यास त्यांची टोमॅटो फ्लूची चाचणी केली जात आहे. या दुर्मिळ आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने पावले उचलली आहे.

केरळमधून इतर राज्यांत या आजाराचा प्रसार होऊ नये, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. केरळ- तमिळनाडू सीमेवरील वालायर जिल्ह्यातून कोईमतूरमध्‍ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांची आणि लहान मुलांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. यासाठी ताप, अंगावरील पुरळ किंवा अन्य आजारांची तपासणी करणाऱ्या दोन वैद्यकीय पथकाची नियुक्ती केली आहे. केरळमधील अंगणवाड्यांमधील पाच वर्षांखालील मुलांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथके नेमण्यात आली आहे.

टोमॅटो फ्लू आजार हा एक अनोळखी ताप आहे. केरळमधील पाच वर्षांखालील मुलांमध्ये तो दिसून येत आहे. हा आजार झालेल्या मुलांच्या शरीरावर लाल रंगाचे पुरळ आणि फोड येतात. म्हणून याला ‘टोमॅटो प्लू’ अथवा ‘टोमॅटो फिव्हर’ असे म्हटले जाते. हा आजार आतापर्यंत केरळमधील काही भागांत आढळला आहे. याचा संसर्ग रोखण्यासाठी उपाय केले नाहीत तर हा विषाणू फैलावण्याची भीती तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT