Ambati Raudu will join Politics: माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायडूने त्याच्या आयुष्यातील नवीन इनिंगची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश करण्याची त्याने घोषणा केली आहे. रायुडूने आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जसाठी शेवटचा सामना खेळला आणि त्यानंतर त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, रायडूने नुकतीच आंध्रप्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील प्रत्येक कानाकोपऱ्याला भेट दिली. गुंटूरच्या भेटीदरम्यान एका स्थानिक पत्रकारांशी बोलताना “मी लवकरच आंध्र प्रदेशातील लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणाही त्याने केली. तसेच, त्याआधी मी जिल्ह्याच्या विविध भागात जाऊन लोकांची समस्या जाणून घेण्याचे ठरवले आहे, असंही त्याने यावेळी सांगितलं. (National Political News)
लोकांच्या गरजा समजून घेण्यासाठी मी ग्रामीण भागाचा दौरा करत आहे. आपण लोकांच्या गरजा कशा पूर्ण करू शकतो, हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तसेच, राजकारणात कोणत्या दिशेने प्रवेश करायचा आणि कोणते व्यासपीठ निवडायचे, याबाबत मी ठोस कृती योजना घेऊन येईन, असंही यावेळी रायुडूने सांगितलं. याशिवाय, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत गुंटूर किंवा मछलीपट्टणममधून निवडणूक लढवण्याच्या चर्चाही त्याने फेटाळून लावल्या आहेत. (Andhra Pradesh Politics)
रायुडूच्या नव्या राजकीय इनिंगच्या चर्चा सुरु झाल्यानंतर तो कोणत्या पक्षात जाणार याबद्दल आता चर्चां सुरु झाल्या आहेत. पण कोणत्या पक्षात जायचं याबाबत अद्याप आपण कोणताही विचार केला नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. पण दुसरीकडे रायुडू वायएसआर काँग्रेस पक्षात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रायडूने 19 एप्रिल रोजी ट्विट करत राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy ) यांच्या भाषणाचे कौतुक केले होते. "उत्तम भाषण... आमचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी... राज्यातील प्रत्येकाचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे." असं ट्विट त्याने केलं होतं. त्यानंतर 2023 च्या फायनलनंतर रायडूने चेन्नई सुपर किंग्जच्या टिमसहसीएम जगन मोहन रेड्डी यांची भेट घेतली होती.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.