Satyendra Jain latest news
Satyendra Jain latest news sarkarnama
देश

Satyendra Jain : 'त्या' व्हायरल व्हिडीओनंतर सत्येंद्र जैन यांना मिळणाऱ्या सुविधा हटवल्या...

सरकारनामा ब्युरो

Satyendra Jain news : दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचा काही दिवसांपुर्वी तुरुंगातील एक व्हिडीओ सोशल मिडीयाावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर महानिरीक्षकांनी स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशीवरून मंत्री सत्येंद्र जैन यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये कपात करण्यात आली आहे. त्यांच्या कोठडीतून टेबल आणि खुर्ची काढून टाकण्यात आली आहे. जैन यांनी जेल मॅन्युअलचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. एकूण 15 दिवसांची ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दरम्यान ते कोणालाही भेटू शकणार नाही.

मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन तुरुंगात मसाज घेतानाचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. तुरुंग अधिकाऱ्यांनी त्यांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप होता. याप्रकरणी कारागृहाच्या सात क्रमांकाच्या बॅरेकचे अधीक्षक अजित कुमार यांना निलंबित करण्यात आले. तर दुसरीकडे, संजय बेनिवाल यांची तिहारचे डीजी संदीप गोयल यांची 4 नोव्हेंबर रोजी बदली कऱण्यात आली. या मुद्द्यावरु भाजपने आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली होती.

व्हीव्हीआयपी वागणूक मिळाल्याच्या आरोपांबाबत समितीने आपला अहवाल सादर केला होताजैन यांचा तुरुंगातील तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर न्यायालयाचने स्थापन केलेल्या समितीने या महिन्यात आपला अहवाल सादर केला. या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. अहवालानुसार, जैन यांनी तुरुंगातील नियमांचे उल्लंघन केले आणि आपल्या पदाचा गैरवापर केला. यामुळे त्यांना तुरुंगात विशेष उपचार/सुविधांचा आनंद घेण्यास मदत झाली. समितीच्या अहवालानुसार, तिहार तुरुंगाचे तत्कालीन डीजी संदीप गोयल हे सत्येंद्र जैन यांच्याशी संगनमत करत असल्याचे आढळून आले.

'कैद्यांनी सत्येंद्र जैन यांना स्वेच्छेने कोणतीही सेवा दिली नाही'

सत्येंद्र जैन यांना कैद्यांनी स्वेच्छेने कोणतीही सेवा दिली नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. उलट, आपण तसे न केल्यास शिक्षा करू, अशी धमकी निलंबित कारागृह अधीक्षकांनी कैद्यांना दिली होती. जैन हे ईडी प्रकरणातील सहआरोपी वैभव, अंकुश, संजय गुप्ता आणि रमण भुरारिया यांच्यासह त्यांच्या खोलीत नियमांचे उल्लंघन करत होते. तसेच सत्येंद्र जैन यांची पत्नी पूनम जैन आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी नियमभंग केला. तुरुंगातील नियमांचे उल्लंघन करून तत्कालीन डीजी संदीप आणि निलंबित तुरुंग अधीक्षक अजित यांच्यासह तुरुंग अधिका-यांच्या संगनमताने कारागृहात त्यांच्याशी वारंवार बैठका होत असायच्या, असेही समितीच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT