Former CM Vijay Rupani  sarkarnama
देश

BJP Politics: विजय रुपाणींच्या निधनानंतर भाजपमध्ये संघटनात्मक बदल; 'या' नेत्याला मिळणार मोठी जबाबदारी

Ahmedabad Plane Crash Vijay Rupani: विजय रुपाणी यांनी पक्षातील नेत्यांमध्ये होत असलेल्या वाद मिटवण्याचे काम केले, आता ही जबाबदारी सुनील जाखड यांच्यावर येणार असल्याची माहिती आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी असलेले त्याचे घनिष्ठ संबध यामुळे जाखड यांनी नियुक्ती निश्चित मानली जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे विमान दुर्घटनेत नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भाजपमध्ये राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. विजय रुपाणी हे पंजाब भाजपचे प्रभारी होते. त्यांच्या जागी नवे नेतृत्व येण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये मोठा संघटनात्मक बदल होणार आहे.

पंजाब भाजपचे अध्यक्ष सुनील जाखड यांची या जागी निवड होण्याची दाट शक्यता आहे, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय म्हणून जाखड यांची ओळख आहे. लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पक्षात संघटनात्मकदृष्ट्या मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

संघटनकौशल्यात पारंगत असलेले विजय रुपाणी यांनी पक्षातील नेत्यांमध्ये होत असलेल्या वाद मिटवण्याचे काम केले, आता ही जबाबदारी सुनील जाखड यांच्यावर येणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी असलेले त्याचे घनिष्ठ संबध यामुळे जाखड यांनी नियुक्ती निश्चित मानली जात आहे. त्यांनी पंजाब नेतृत्व करावं, अशी मोदी-शाह यांची इच्छा आहे.

दरम्यान, रुपाणी यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले आहे. त्यांच्या मृतदेहाची डीएन टेस्ट केल्यानंतर तो त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आला. यावेळी त्यांची पत्नी अंजली रुपाणी, त्यांचे कुटुंबिय, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते. रुपाणी यांच्या पार्थिवावर आज राजकोट येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

लुधियाना पश्चिम मतदारसंघाला तिकीट देण्यासाठी पक्षाने आपल्याच कार्यकर्त्यांवर अवलंबून राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पंजाबमध्ये स्वबळावर पुढे जाण्याची तयारी असल्याचे संकेतही भाजपने दिले आहेत.

लुधियाना पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी,दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आदी मोठे नेते उमेदवार जीवन गुप्ता यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT