Political parties and AI campaigns Sarkarnama
देश

Delhi Election: दिल्लीत AI ठरतेय EC ची डोकेदुखी! निवडणूक आयोगाकडून सूचना

AI in Delhi Election Campaign EC Issues Guidelines to Political Parties: एआयने तयार केलेला कोणताही फोटो, व्हिडिओ किंवा इतर साहित्य राजकीय पक्ष, उमेदवार वापरत असेल तर त्याचा स्रोत उघड काय आहे, हे सांगणे आवश्यक आहे.

Mangesh Mahale

Delhi News : दिल्ली विधानसभा (Delhi Election) निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. आज दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. दिल्लीच्या निवडणुकीच्या प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे. AIच्या माध्यमातून होत असलेला प्रचार केंद्रीय निवडणुक आयोगासाठी डोकेदुखी ठरत आहे. याबाबत आयोगाने पक्षाना सूचना दिला आहेत.

प्रचार करताना पक्षानी AIचा वापर जबाबदारीपणे करावा, त्यात पारदर्शकता ठेवा, अशी सूचना निवडणुक आयोगाने दिली आहे. एकमेकांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी AIचा गैरवापर सुरु असल्याचे आयोगाने निर्दशनास आले आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी एआय वापरून प्रसिद्ध केलेली सामग्री योग्यपद्धतीने उघड करा, अशा सूचना आयोगाने दिल्या आहेत. निवडणुकीत एआयच्या गैरवापराबद्दल यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी चिंता व्यक्त केली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) तयार केलेला कोणताही फोटो, व्हिडिओ किंवा इतर साहित्य राजकीय पक्ष, उमेदवार वापरत असेल तर त्याचा स्रोत उघड काय आहे, हे सांगणे आवश्यक आहे. याबाबतची स्पष्टीकरण त्यांना द्यावे लागणार असल्याचे आयोगाने म्हटलं आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही आयोगाने सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

सोशल मीडिया आणि AI चा गैरवापर रोखण्यासाठी एका अधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहे. डीपफेक व्हिडिओमुळे निवडणूक कायदे आणि नियमांचे उल्लंघन करून निवडणूक प्रक्रियेत येत असल्याचे आयोगाने म्हणणे आहे. चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाला सावध राहावे लागेल, अशी माहिती थांबवण्यासाठी जलद कारवाई करावी लागेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. 8 फेब्रुवारीला निकाल आहे. सत्ताधारी आपने 2015, 2020 च्या विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे 67, 62 जागा पटकावल्या होत्या, या निवडणुकीत आप हॅट्रिक करण्याचा तयारीत आहेत. एकूण 1.55 कोटी पेक्षा जास्त मतदार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT