AIMIM West Bengal election Sarkarnama
देश

AIMIM West Bengal election preparation : 'AIMIM'चा काॅन्फिडंट वाढला; 'बिहार तो झांकी है, बंगाल और यूपी बाकी है', ठोकली आरोळी!

Asaduddin Owaisi AIMIM Signals Preparation for West Bengal & UP After Bihar Election Boost : असदुद्दीन ओवैसी यांच्या 'AIMIM' पक्षाने बिहार निवडणुकीनंतर पश्चिम बंगाल आणि युपीमधील निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे संकेत दिले आहेत.

Pradeep Pendhare

AIMIM Bihar election confidence : बिहार निवडणुकीत सीमांचल भागात 'AIMIM'ने एकूण 29 जागांवर उमेदवार उभे करत, आमौर, बहादूरगंज, कोचाधामन, जोकिहाट आणि बैसी या पाच जागांवर विजय मिळवला.

या विजयानंतर 'AIMIM'चा काॅन्फिडंट वाढला असून, 'बिहार तो झांकी है, बंगाल और यूपी बाकी है', अशी आरोळी ठोकली आहे. या निवडणुकीत 'AIMIM'चा थेट महाविकास आघाडीला फटका बसल्याचे विश्लेषणकांचे म्हणणे आहे. तर 'AIMIM'ने महाविकास आघाडीमुळे आमच्या जागा कमी झाल्याचा दावा केला आहे. या आरोप-प्रत्यारोपांमध्ये 'AIMIM'चा वाढलेल्या काॅन्फिडंटची चर्चा सुरू आहे.

'AIMIM'ने बिहारमध्ये मिळवलेल्या यशानंतर असदुद्दीने ओवैसी (Asaduddin Owaisi) भलतेच आनंदीत आहे. त्यांनी थेट बिहार दौरा जाहीर केला आहे. मेरे भाइयों और बहनों, आप का शुक्रिया अदा करने के लिए इंशाल्लाह 21 और 22 नवंबर को मैं सीमांचल में रहूँगा, अशी घोषणा केली आहे.

बिहारच्या निवडणुकीच्या निकालानंतर तिथं सोशल मीडिया वाॅर सुरू झाला आहे. 'AIMIM'ला टार्गेट करताना, मुस्लिमांना (Muslim) लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला. मुस्लिमांनी महाविकास आघाडीला मतदान केले नसल्याचा, आरोप सोशल मीडियावरून होत आहेत. पांव जीतो पचास हराओ, भाजपा की डोर से पतंग उड़ाओ। अशा पद्धतीने 'AIMIM'ला ट्रोल केलं जात आहे.

'AIMIM'ला बिहारमध्ये किती मुस्लिम मतं मिळाली

यावर 'AIMIM'ने बिहारमधील मुस्लिम मतदानाची आकडेवारी मांडली. बिहारमध्ये 18% मुस्लिम आहे. यातील 1.85% मतं 'AIMIM'ला मिळाली आहेत. बाकी 16.15 टक्के मत कोणाला मिळाली, असा सवाल 'AIMIM'ने केला आहे. यावरून कोण जिंकतो, कोण हारतो ही आमची जबाबदारी नाही, असे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे.

'AIMIM'कडून पश्चिम बंगालची तयारी

दरम्यान, 'AIMIM'ने बिहारमध्ये मिळवलेल्या यशानंतर थेट पश्चिम बंगाल आणि युपी निवडणुकीची तयारीची घोषणा सुरू केली. 'बिहार तो झांकी है, बंगाल और यूपी बाकी है', असे म्हणून पश्चिम बंगालमध्ये 'AIMIM' निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. पश्चिम बंगालमध्ये 'AIMIM' किती जागा लढवणार, संघटनाची काय तयारी सुरू आहे, यामुळे उत्सुकता वाढली आहे.

सत्तास्थापनेसाठी वेगळा प्रस्ताव

तसंच, बिहारमध्ये 'AIMIM'ने राजकीय खेला करण्यास सुरूवात केली. भाजपला रोखण्यासाठी जेडीयूला आरजेडी-काँग्रेसला बरोबर घेऊन सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला आहे. पण यात मुख्यमंत्रीपद 'AIMIM'हवं आहे. 'जेडीयू'ला 2 उपमुख्यमंत्री, 20 मंत्री, 'आरजेडी'ला सहा मंत्री, काँग्रेसला दोन मंत्री, 'CPIML' आणि 'CPIM'ला प्रत्येकी एक मंत्री देण्याचं सुचवलं आहेत. तर नीतीशकुमार यांना 2029ला पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे प्रस्तावात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT