Wreckage of the Air India flight that crashed near a medical college in Ahmedabad; AAIB report links the tragedy to sudden engine failure after takeoff  Sarkarnama
देश

Air India Plane Crash Report : 'तुम्ही इंधन का बंद केलं...', एअर इंडिया विमान अपघातापूर्वीचं दोन्ही वैमानिकांमधील धक्कादायक संभाषण आलं समोर

Air India plane crash investigation report AAIB : अहमदाबादहून लंडनला जात असलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा 12 जून रोजी भीषण अपघात झाला. त्यामध्ये 260 जणांचा मृत्यू झाला होता. आता या अपघाताचा प्रारंभिक तपास अहवाल भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने सादर केला आहे.

Jagdish Patil

Air India Plane Crash Repor : अहमदाबादहून लंडनला जात असलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा 12 जून रोजी भीषण अपघात झाला. त्यामध्ये 260 जणांचा मृत्यू झाला होता. आता या अपघाताचा प्रारंभिक तपास अहवाल भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने सादर केला आहे.

या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 15 पानांच्या या अहवालात कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये अपघाताच्या आधी नेमका काय संवाद झाला, याची माहिती देखील देण्यात आली आहे. अहवालानुसार, उड्डाणानंतर काही सेकंदांत विमानाचे दोन्ही इंजिन अचानक बंद पडल्यामुळे विमानाचा वेग कमी झाला आणि ते कोसळलं.

तर अपघातापूर्वी दोन्ही वैमानिकांमध्ये काही संभाषण होतं आणि संभाषणानंतर काही सेकंदांतच विमानाचा वेग कमी होतो आणि ते मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर आदळल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं होतं.

भारताच्या विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ने सादर केलेल्या अहवालामुळे तांत्रिक कारणांसह कॉकपिटमध्ये वैमानिकांमध्ये नेमकं संभाषण झालं हे देखील समोर आलं आहे. तर या संभाषणामुळे आता नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत.

वैमानिकांमधील संभाषण नेमकं काय?

विमानाच्या उड्डाणानंतर लगेचच, विमानाच्या इंजिनला इंधन पुरवठा करणारे स्विचेस रन (RUN) मोडवरून कटऑफ (CUTOFF) मोडवर गेले होते. स्विच अचानक एका मोडवरून दुसऱ्या मोडवर गेल्याचं लक्षात येताच कॉकपिटमधील एक वैमानिक दुसऱ्याला विचारतो की, "तू इंधन पुरवठा का बंद केलास?" त्यावर दुसरा वैमानिक, "मी काहीही केलेले नाही", असं सांगतो.

त्यानंतर काही सेकंद कटऑफ स्विच विमान रन मोडवर करण्यात येतं. मात्र तोपर्यंत विमानाची उंची कमी झाल्यामुळे ते पुन्हा सुरक्षित पातळीवर नेण्यासाठी वेळ मिळला नाही. त्यामुळेच ते विमान अहमदाबादमधील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT