indira gandhi, jrd tata sarkarnama
देश

'डिअर इंदिरा..' जेआरडी टाटांचे भावूक पत्र व्हायरल

एप्रिल १९८० मध्ये पुन्हा इंदिरा गांधी (indira gandhi) या सत्तेत आल्या. त्यांनी लगेच जेआरडी टाटा (jrd tata) यांना इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडियामध्ये घेतले. पण त्यांना चेअरमनपद दिल नाही.

सरकारनामा ब्युरो

पुणे : टाटा सन्सकडे पुन्हा एअर इंडियांची (air india) मालकी आली अन् कॉग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एअर इंडियाच्या संबधीत काही जुन्या आठवणी समाजमाध्यमांवर शेअर केल्या आहेत. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी (indira gandhi) आणि टाटा समुहाचे जेआरडी टाटा (jrd tata) यांच्यातील भावपूर्ण पत्रव्यवहार जयराम रमेश यांनी टि्वट केला आहे. हे पत्र सध्या समाजमाध्यमांवरुन व्हायरल होत आहे. दोन्ही मोठ्या व्यक्तीमत्वांच्या मनातील हळवा कोपरा यानिमित्ताने जगासमोर पुन्हा एकदा आला आहे.

तत्कालीन मोरारजी देसाई सरकारने ता. १ फेब्रुवारी १९७८ रोजी जेआरडी टाटा यांना एअर इंडियाच्या चेअरमन पदावरून तडकाफडकी हटविण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी इंदिरा गांधींनी जेआरडी टाटा यांना दिल्लीतून कोलकात्याला जाण्याच्या विमानातून आपल्या हस्ताक्षरात पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी जेआरडी टाटांच्या कामाचं कैातुक करुन त्यांना या पदावर काढून टाकल्याचे दुःख व्यक्त होते. हे पत्र वाचून जेआरडी टाटांना खूप भावुक झाले होते. त्यांनी इंदिराजींना पत्र लिहिलं होते. ही दोन्ही पत्र जयराम रमेश यांनी टि्वट केली आहेत.

एप्रिल १९८० मध्ये पुन्हा इंदिरा गांधी (indira gandhi) या सत्तेत आल्या. त्यांनी लगेच जेआरडी टाटा (jrd tata) यांना इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडियामध्ये घेतले. पण त्यांना चेअरमनपद दिल नाही. इंदिराजींनी जेआरडी टाटा यांना “डिअर जेह” या नावाने संबोधले आहे, तर टाटांनी इंदिराजींना “डिअर इंदिरा” या एकेरी नावाने संबोधले आहे.

टाटा यांना लिहिलेल्या पत्रात इंदिरा गांधी म्हणतात..

डिअर जे,

आता आपण एअर इंडियासोबत नाही. याचे वाईट वाटते. मला याचे दुःख आहे.तुम्ही फक्त चेअरमन नव्हता तर एअर इंडियाचे संस्थापक, मालक आहात. तुमच्यामुळेचचत एअर इंडिया जगातील अग्रेसर विमानकंपन्याच्या यादीत आहे. तुमचे एअर इंडियाशी भावनिक नाते आहे. मला तुमचा गर्व आहे की तुम्ही एअर इंडियात होते. याबाबत भारत सरकार आपली ऋणी आहे.

इंदिरा गांधी यांना लिहिलेल्या पत्रात टाटा म्हणतात...

डिअर इंदिरा,

एअर इंडियातून मला काढून टाकल्यानंतर आपण मला पत्र लिहिलं त्याबाबत मी आपला आभारी आहे. एअर इंडियातील माझ्या योगदानाबाबत तुम्ही लिहिलं, हे मला खूपच भावलं. एअर इंडियाचे कर्मचारी आणि भारत सरकारच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हते. आशा करतो की तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो, माझ्या तुम्हाला शुभेच्छा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT