AAIB investigation into the cause of Learjet 45 crash 2026 Sarkarnama
देश

Ajit Pawar Death Case: अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी मोठी अपडेट! महत्वाचा होणार खुलासा; केंद्रीय उड्डाण मंत्रालयानं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Death Case Inquiry: यासंदर्भात सातत्यानं घातपाताचे आरोप होत असताना केंद्र सरकारनं आता महत्वाचं पाऊल उचललं आहे.

Amit Ujagare

Ajit Pawar Death Case Inquiry: राज्याचे ज्येष्ठ नेते दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी मोठी आपडेट समोर आली आहे. यासंदर्भात सातत्यानं घातपाताचे आरोप होत असताना केंद्र सरकारनं आता महत्वाचं पाऊल उचललं आहे. यामुळं या विमान अपघातप्रकरणी महत्वाचा खुलासा होणार आहे.

अजित पवारांच्या अपघाती निधनावर सातत्यानं संशय व्यक्त केला जात आहे. आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी सातत्यानं विविध प्रकारचे संभाव्य पुरावे सदृश्य गोष्टी माध्यमांसमोर आणून या अपघाताबाबतच्या चर्चांनी अधिक गंभीर स्वरुप धारण केलं आहे. यासाठी अनेक प्रकारच्या कॉन्सिरन्सी थिअरी सांगितल्या जात आहेत. खुद्द पवार कुटुंबातील व्यक्तींनीच यासंदर्भात सातत्यानं संशय व्यक्त करुन चौकशीची मागणी केली आहे. यापार्श्वभूमीवर आता केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

AAIB (Aircraft Accident Investigation Bureau) विमान अपघात चौकशी ब्युरोला या अपघाताच्या चौकशीचे आदेश केंद्रीय उड्डाण मंत्र्यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे हा ब्युरो केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाच्या अखत्यारित येत नाही. पण त्यांना जगभरातील कोणत्याही एजन्सीकडून चौकशीसाठी मदत घेऊन चौकशी करण्याची परवानगी असते. माजी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळातच या विशेष ब्युरोची स्थापना झाली होती. आता त्याच यंत्रणेमार्फत अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT