Ajit Pawar, Sharad Pawar, Narendra Modi Sarkarnama
देश

Sharad Pawar Birthday : शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन अजितदादांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर PM मोदींकडून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना!

Ajit Pawar meet Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शरद पवारांना ट्विटद्वारे शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे.

Jagdish Patil

NCP News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शरद पवारांना ट्विटद्वारे शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे.

तर सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे थेट शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यासाठी पोहोचले आहेत. तर अजित पवारांनी थेट शरद पवारांची त्यांच्या दिल्लीतील घरी जाऊन भेट घेतल्यामुळे राज्यासह देशभरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP) फुटीपासून या दोन्ही नेत्यांमध्ये मोठी दरी निर्माण झाली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हे काका-पुतणे एकमेकांच्या विरोधात उभे होते. निवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबियांमध्ये मोठी फूट पडली होती. याची झलक दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमावेळी दिसून आली होती.

शिवाय या कार्यक्रमानंतर काही व्यासपीठावर हे नेते एकत्र आले होते. त्यावेळी देखील त्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं होतं. मात्र, आता थेट अजितदादांनी शरद पवारांची (Sharad Pawar) घरी जाऊन भेट घेणं हे अनपेक्षित होतं, त्यामुळे या भेटीवर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी हे सर्व नेते दाखल झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT