Ajit Pawar plane crash update Sarkarnama
देश

Ajit Pawar Plane Crash: ऐनवेळी वैमानिक का बदलला? अजितदादा अपघात तपासात मोठी अपडेट: विमान मालकाची कसून चौकशी

VSR Company owne VK Singh Inquire from CID: अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी तपास वेगात असून व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही.के.सिंग यांची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली.

Sudesh Mitkar

Pune News: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील विमान अपघात प्रकरणी सीआयडी तपासाला वेग आला आहे. अजितदादांनी ज्या विमानाने प्रवास केला होता त्या व्हीएसआर कंपनीची चौकशी सुरू झाली आहे, कंपनीचे मालक व्ही के सिंग यांची सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. याला सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

28 जानेवारीला मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या व्हीएसआर या प्रायव्हेट कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील चार अन्य प्रवासी मृत्युमुखी पडले होते. या अपघातानंतर प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद बारामती पोलिसांत झाली होती.त्यानंतर ही तक्रार सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

सीआयडीने विमान अपघातातील गुन्हेगारी कट, किंवा दुर्लक्ष यांच्या दृष्टिकोनातून तपास सुरू केला आहे. यापूर्वीच कंपनीला प्रश्नावली पाठवण्यात आली होती. आता कंपनीचे मालक व्ही के सिंग, रोहित सिंग यांच्यासह व्हीएसआरचे काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सीआयडी चौकशी करणार आहे.

ज्या चौकशीमध्ये विमानाचे बुकिंग कधी आणि कसे झाले, त्याचे भाडे, बुकिंग प्रक्रिया काय होती. विमानाची स्थिती, देखभाल आणि कंपनीची इतर कागदपत्रे कंपनीकडून मागवली जाणार आहेत. विमानासाठी वैमानिक कोणी नेमला आणि विमानाची निवड कोणी केली. अपघातापूर्वी कंपनीच्या कार्यपद्धतीत काही अनियमितता होती का? या सर्व गोष्टींची माहिती कंपनीकडून सीआयडी घेणार असल्याचे समजते.

डीजीसीए ने २४ फेब्रुवारीला प्रसिद्ध केलेल्या अहवालात विमान कंपनीच्या अनेक चुका आणि अनियमितता दाखवल्या होत्या. अपघातानंतर कंपनीवर अनेक आरोप झाले आहेत. अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी रोहित सिंग यांच्या विरोधात व्हिडिओ शेअर करून गंभीर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता.

आता सीआयडीच्या पुणे ऑफिसमध्ये व्ही के सिंग आणि अन्य कर्मचाऱ्यांचे गेल्या काही तासांपासून सीआयडी चौकशी सुरु असल्याची माहिती आहे. रोहित सिंग यांना देखील चौकशीसाठी बोलवले जाणार असल्याचे सांगितले जाते. आता यात चौकशीमध्ये काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT