NCP News Sarkarnama
देश

NCP News : राष्ट्रवादी फुटीनंतर अजितदादा-सुप्रिया सुळे पहिल्यांदाच एका मंचावर; नेमकं काय बोलणार?

Sharad Pawar With Ajit Pawar News : "शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन.."

Chetan Zadpe

Pune Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे तिघेही नेते एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या उद्घाटनासाठी पहिल्यांदाच पवार कुटुंब एका जाहीर कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत तिन्ही नेत्यांची नावे नमूद केली आहेत. (Latest Marathi News)

अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पुणे जिल्ह्यातील भिगवणमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात तिघे दिग्गज पवार एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, तर या वेळी अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार आहेत.

अजितदादांवर भाष्य -

अजितदादा महायुतीचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी अजितदादांबाबत स्पष्टच बोलल्या होत्या. सुळे म्हणाल्या, "जे नेते बाहेर पडले, त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी आम्ही विधानसभा अध्यक्षांना आणि लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र दिलं आहे.

त्यांनी घेतलेली भूमिका पक्षाला मान्य नाही, आमच्या पक्षाच्या विचारधारेला पटणारी नाही. त्यांचा निर्णय आमच्या पक्षाच्या विचारधारेला पटणारा नाही, त्यावर काय कारवाई करायची हा अध्यक्षांचा निर्णय असेल, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

"अजितदादांचं नेतृत्व सगळ्या महाराष्ट्राला मान्य आहे, पण त्यांनी केलेले आरोप वास्तवतेला धरून नव्हते. ते आम्हाला वेदना देणारे होते, पण काही आरोप न पटणारे होते, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. यानंतर आता प्रथमच अजितदादा आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार आहेत. या वेळी भाषणात ते नेमके काय बोलणार, याकडे लक्ष लागले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT