Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, या शपथविधीच्या दोन दिवस आधीच अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला होता.
अजित पवार यांनी शपथविधीआधी निवडणूक आयोगात याचिका दाखल केली. या याचिकेवर राष्ट्रवादीचे खासदार आणि आमदार मिळून अशा एकूण 40 जणांच्या सह्या आहेत. अजित पवार यांनी शपथविधीच्या आधी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता अजित पवार यांनी पूर्ण पक्षावर दावा केल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचे म्हटले आहे, अशी माहिती मिळत आहे.
अजित पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली. पक्षाच्या 40 आमदार आणि खासदारांनी मिळून ठराव केला. या ठरावात अजित पवार यांचा दावा योग्य असल्याचे म्हटले. हा ठराव देखील याचिकेसोबत जोडण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक आयोगात दाखल कागदपत्रांमध्ये अजित पवार यांची सर्वमताने राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे पत्र देखील देण्यात आले आहे, अशी माहीत आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादीच्या चिन्हासाठी आता निवडणूक आयोगात लढाई होणार का? याकडे लक्ष लागले आहे. 3 जुलैला जयंत पाटील यांच्याकडून कॅविएट दाखल करण्यात आले आहे. 3 जुलैलाच जयंत पाटील यांनी 9 आमदारांवर अपात्रतेची कारवाईसाठी पत्र दिल्याचे निवडणूक आयोगाला कळवले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.