Akhilesh yadav Sarkarnama
देश

Akhilesh Yadav : 'त्या' पोस्टरमुळे अखिलेश यादव पुन्हा आले चर्चेत; काय आहे प्रकरण?

AKhilesh Yadav Poster : लखनऊमध्ये आज सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे बॅनर लावण्यात आले आहे. हे बॅनर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

Rashmi Mane

Samajwadi Party News: उत्तर प्रदेशचे राजकारणा पुन्हा एकदा तापतांना दिसत आहे. पोटनिवडणुकीपूर्वीच समाजवादी पार्टीने 2027 च्या विधानसभेची तयारी केली आहे. लखनऊमध्ये आज सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे बॅनर लावण्यात आले आहे. लखनऊमधील समाजवादी पार्टीच्या कार्यालयाबाहेर लावलेले पोस्टर्सची सर्वत्र चर्चा होत आहे. "24 मध्ये जनतेच्या आशीर्वादाचा वर्षाव झाला आहे, भिंतींवर लिहिले आहे, सत्तावीसचा अधिपती कोण होणार? अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. हे बॅनर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

यानंतर नव्या 'पोस्टर वॉर'ला सुरूवात झाली आहे. हे बॅनर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. अखिलेश यांच्या समर्थकांनी राज्यभर वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर लावले आहेत. यातील एक बॅनर चर्चेचा विषय बनला आहे.

सपा नेते जयराम पांडे यांनी पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शुभेच्छा दिल्या आहेत आणि सपा कार्यालयाबाहेर एक विशेष बॅनर लावले, जे प्रचंड व्हायरल झाले आहे. जयराम पांडे यांनी एसपी कार्यालयाबाहेर लावलेल्या होर्डिंगमध्ये अखिलेश यादव यांच्या डोक्यावर समाजवादी पक्षाची पारंपरिक लाल टोपी घातलेला फोटो आहे. होर्डिंगवर लिहिले आहे, '24 मध्ये जनतेच्या आशीर्वादाचा वर्षाव झाला, भिंतींवर लिहिले आहे, सत्तावीसचा अधिपती कोण होणार?' 3 वर्षांपूर्वी 2021 मध्ये जयराम पांडे यांनी 'आ रहा हूं'चे बॅनर लावले होते.

संस्कृतमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा

बॅनरच्या शेवटी अखिलेश यादव यांना संस्कृत भाषेत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पोस्टरवर लिहिले आहे, 'त्वं जीव शतां वर्धमानः। जीवनं तव भवतु सार्थकम् । इति सर्वदा मुदं प्रतिमेहे । वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.' त्याचा मराठीत असा अर्थ आहे की, 'तुम्ही शत वर्ष जगू शकाल.' तुमचे जीवनाचे सार्थक होवो. आपण नेहमीच आपला आनंद व्यक्त करतो. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.'

काही दिवसापूर्वी डिंपल यादव बॅनर लावण्यात आले होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या काळात सपाच्या पक्ष कार्यालयाबाहेर अखिलेश यादव यांचे बॅनर चर्चेत आले होते. त्या बॅनरमध्ये सपा अध्यक्षांचे देशाचे भावी पंतप्रधान असे वर्णन करण्यात आले होते. तसेच, याआधीही अखिलेश देशाचे भावी पंतप्रधान होणार असल्याची बॅनर अनेकदा पाहायला मिळाली आहेत. याशिवाय एका बॅनरमध्ये अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचे उत्तर प्रदेशच्या भावी मुख्यमंत्री म्हणून वर्णन करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT