mayawati_
mayawati_ 
देश

मध्यप्रदेशात सपाला कॉंग्रेसने मंत्रिपद दिले नाही म्हणून अखिलेश नाराज

सरकारनामा

नवी दिल्ली : कॉंग्रेस पक्षाने मध्यप्रदेशात जाहीर केलेल्या मंत्रिमंडळात समाजवादी पार्टीला स्थान दिले नाही याबद्दल अखिलेश यादव यांनी उपरोधिक भाषेमध्ये कॉंग्रेसविषयी नाराजी व्यक्त केली.

मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रेस पक्षाचे 114 आमदार आहेत. बहुजन समाज पार्टीच्या दोन आणि समाजवादी पार्टीच्या एका आमदाराच्या पाठिंब्यावर कॉंग्रेसने बहुमताचा आकडा गाठलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर मध्यप्रदेशामध्ये बसपा आणि सपाला मंत्रिमंडळात संधी मिळण्याची अपेक्षा होती.

अखिलेश यादव याविषयी बोलताना म्हणाले, "आमच्या आमदाराला मंत्री केले नाही याबद्दल आम्ही कॉंग्रेस पक्षाचे आभार मानतो. कॉंग्रेस पक्षाने अशी कृती करून उत्तर प्रदेशसाठी मार्ग मोकळा केला आहे.''

कॉंग्रेसपक्षाचे नेते राज बब्बर या बाबत बोलताना म्हणाले, " कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टीचे नेते एकत्र बसून हा प्रश्‍न मार्गी लावतील.''

येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात कॉंग्रेस पक्षाला समाजवादी पार्टी आणि बसपा बरोबर आघाडी होणे महत्त्वाचे आहे. पण बसपा आणि सपा थर्ड फ्रंटबरोबर जाण्याच्या विचारात दिसत आहेत. अखिलेश यादव यांनी तेलगणांचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या थर्डफ्रंटच्या प्रयत्नाचे स्वागत करताना त्यांच्या भेटीसाठी हैदराबादला जाणार असल्याचे सांगितलेले आहे.

या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेससाठी उत्तर प्रदेशचा मार्ग खडतर होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT