नवी दिल्ली : मानव वंशशास्त्र किंवा वैज्ञानिकदृष्ट्या कोणतीही देवता ब्राह्मण नाही. क्षत्रिय ही सर्वांत श्रेष्ठ जात आहे. हिंदू देवता कोणत्याही उच्च जातीमधून आलेल्याच नाहीत. भगवान जगन्नाथ आदिवासी वाटतात. भगवान शिवशंकरही मागासवर्गीय जमातींमधील असावेत, कारण ते स्मशानात व सापांच्या सान्निध्यात रहातात. त्याच्या अंगावर फार कमी कपडे अससतात. या पध्दतीने कोणताही ब्राह्मण स्मशानात बसेल असे मला वाटत नाही.....हे ‘ज्ञानदान' दुसरे तिसरे कोणी नव्हे तर दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) कुलगुरू शांतीश्री पंडित, यांनी केले आहे.
पंडित यांच्या या ‘पांडित्यावर' जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याच व्याख्यानात पंडित यांनी, भारतीय समाजाला काही चांगले घडवायचे असेल तर जातिव्यवस्था संपुष्टात आणणे आवश्यक आहे हे सत्यही सांगितले.कुलगुरू पंडित यांच्याशी त्यांच्या या विधानांंबाबत ‘सकाळ' ने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दूरध्वनीवर आल्या नाहीत. त्या बिझी आहेत, असेच सातत्याने सांगण्यात आले.
केंद्रीय सामाजिक न्याय और अधिकार मंत्रालयातर्फे जनपथ रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये, 'लैंगिक न्यायावर डॉ. बी आर आंबेडकर यांचे विचार: समान नागरिक संहितेचे डिकोडिंग' (‘डॉ. बी. आर आंबेडकर थॉट ऑन जेंडर जस्टिस ः डिकोडिंग द युनिफॉर्म सिव्हिल कोड’) या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन काल केले होते. त्यामध्ये बोलताना कुलगुरू पंडित यांनी मनुस्मृतीचा दाखला देऊन सांगितले की मनुस्मृतीनुसार साऱया महिला शूद्र आहेत. कोणतीही महिला दावा करूच शकत नाही की ती ब्राह्मण किंवा कोणत्या अन्य जातीतून आलेली आहे. माझ्या मतानुसार कोणत्याही महिलेला तिचे वडील किंवा पतीकडून जाती मिळते असे मानणे असाधारणपणे प्रतिगामी आहे.
मानववंश शास्त्रीयदृष्ट्या देव उच्च जातीचे नाहीत. कोणीही देवता ब्राह्मण नाही. सर्वांत उच्च दर्जा क्षत्रियांचा आहे. अगदी भगवान शिवही अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमधील असावेत. लक्ष्मी, शक्ती आणि जगन्नाथ असे सर्व देवी-देवता आदिवासी आहेत. मग आपण अमानवीय असे भेदभाव अजूनही का पाळत आहोत हा प्रश्न आहे.
कुलगुरू पंडित म्हणाल्या...
- भारतीय समाजाला काही चांगले घडवायचे असेल तर जातिव्यवस्था संपुष्टात आणणे आवश्यक आहे. भेदभाव आणि असमानेतेचे समर्थन करणाऱ्या अशा पद्धतीच्या ओळखीसाठी आपण इतके भावनिक का होतो, हे मला समजत नाही. अशी कृत्रिम ओळख जपण्यासाठी आपण कोणालाही मारण्यासाठी तयार होतो.
- बौद्ध धर्म सर्वांत महान धर्मांपैकी एक आहे. कारण मतभेद, वेगवेगळे विचार यांना भारतीय सभ्यतेत स्थान दिले जाते, हे या धर्मानुसार सिद्ध होते.
- ब्राह्मणवादी हिंदू धर्माचे पहिले विरोधक गौतम बुद्ध आहेत. इतिहासातील ते पहिले तर्कवादी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुनरुज्जीवित केलेली परंपरा आज आपल्याकडे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.