sharad pawar sarkarnama
देश

पवार-गडकरी-राऊत एकाच पंगतीत ; EDच्या कारवाईनंतर पवारांच्या घरी स्नेहभोजन

स्नेहभोजनात नेत्यांमध्ये ईडीच्या कारवाईबाबत चर्चा झाली का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्राचं राजकारण ईडीची (ED) चौकशी आणि आरोप्रत्यारोपांच्या फैरी या भोवती फिरत आहे. नेत्यांची होणारी ईडी चौकशी, संबंधित पक्षांच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं जनतेचं लक्ष वेधत आहेत. मंगळवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीनं कारवाई केली. राऊतांचे अलिबागमधील आठ प्लॉट्स आणि दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत.

एकीकडे ईडीकडून महाविकास आघाडी सरकारवरील नेत्यांवर कारवाई होत असताना दुसरीकडे नेत्यांची घरी जेवणावळी सुरु असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राऊतांवर ईडीची कारवाई झाल्यानंतर त्यांच्या दिल्लीतील घरी चहापानाच्या कार्यक्रम झाला. या चहापानाला शिवसेना नेत्या नीलम गौऱ्हे, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार, शिवसेनेचे मंत्री दादासाहेब भुसे देखील उपस्थित आहेत. महाविकासआघाडीतील अनेक मोठे नेते संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होते.

राऊतांच्या घरी चहापान झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या घरी सर्वपक्षीय आमदारांनी हजेरी लावली. ज्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना खासदार संजय राऊत हेही उपस्थित होते. सध्या महाराष्ट्रातले आमदार प्रशिक्षणासाठी नवी दिल्लीमध्ये आहेत.

या निमित्ताने शरद पवार यांनी आमदारांसाठी मंगळवारी रात्री आपल्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. या स्नेहभोजनाला राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस तसंच भाजपच्याही आमदारांना निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानुसार चारही पक्षांचे आमदार आणि काही निवडक खासदारांनी या स्नेहभोजनाला उपस्थित होते.

या स्नेहभोजनाचा एक फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या फोटोत संजय राऊत हे शरद पवारांच्या उजव्या बाजुला बसलेले दिसत आहेत, मध्ये शरद पवार बसलेले आहेत, तर डाव्या बाजुला नितीन गडकरी बसलेले आहे. या स्नेहभोजनात नेत्यांमध्ये ईडीच्या कारवाईबाबत चर्चा झाली का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. मात्र, याबाबत कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

या स्नेहभोजनाला खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, डॉ. अमोल कोल्हे, श्रीकांत शिंदे, खासदार सुनील तटकरे, डॉ. फौजिया खान, विनायक राऊत,ओमराजे निंबाळकर या खासदारांनी उपस्थिती लावली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,आदिती तटकरे, सुनील शेळके, कृषीमंत्री दादाजी भुसे, रोहित पवार, झिशान सिद्धीकी, अनिकेत तटकरे, डॉ. प्रज्ञा सातव यांच्यासोबत काही भाजप आमदारांनीही उपस्थित लावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT