High Court Order Sarkarnama
देश

High Court Order : पालकांच्या इच्छेविरोधात लग्न करणाऱ्या जोडप्यांसाठी मोठी बातमी; पोलिस संरक्षणाबाबत हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

No Right to Seek Police Protection in Such Marriages : एका जोडप्याने कोर्टात पोलिस संरक्षणाची मागणी करणाची याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीदरम्यान कोर्टाने हा निकाल दिला आहे.

Rajanand More

High Court News : अलाहाबाद हायकोर्टाने पालकांच्या संमतीशिवाय किंवा त्यांच्या इच्छेविरोधात जाऊन लग्न करणाऱ्या तरूण-तरुणींविषयी महत्वपूर्ण निकाल दिला आहे. पालकांच्या इच्छेविरोधात लग्न करणाऱ्या जोडप्याला कोर्टाकडे पोलिस संरक्षणाच्या अधिकाराचा दावा करता येणार नाही. त्यांच्या जीविताला किंवा स्वातंत्र्याला धोका असल्याचे स्पष्ट झाल्याशिवाय त्यांना संरक्षण मिळणार नाही, असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

एका जोडप्याने कोर्टात पोलिस संरक्षणाची मागणी करणाची याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीदरम्यान कोर्टाने हा निकाल दिला आहे. संरक्षणाची खरंच गरज असल्यास कोर्टाकडून ते मिळवून दिले जाऊ शकते. पण कोणताही धोका नसल्यास संबंधित जोडप्याने एकमेकांना आधार देत समाजाला सामोरे जायला हवे, असेही कोर्टाने म्हटले आहे.

न्यायाधीश सौरभ श्रीवास्तव यांनी हे निरीक्षण नोंदवले आहे. श्रेया केसरवाणी आणि त्यांच्या पतीने ही याचिका दाखल केली होती. पोलिस संरक्षणाप्रमाणेच त्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्यात कुणीही ढवळाढवळ करू नये, असे संबंधितांना आदेश देण्याची मागणीही कोर्टाकडे केली होती. पण सुनावणीनंतर जोडप्याला कोणत्याही संरक्षणाची गरज नसल्याचे निरीक्षण नोंदवत कोर्टाने ही याचिका निकाली काढली.

कोर्टाने निकाल देताना म्हटले की, आपल्या इच्छेनुसार लग्न करण्यासाठी पळून गेलेल्या अशा तरुण-तरूणींना संरक्षण देण्यासाठी न्यायालये नाहीत, असे सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात म्हटले आहे. त्यामुळे पोलिस संरक्षणाबाबत कोणतेही आदेश देण्याची गरज नाही. याचिकाकर्त्यांच्या जीविताला धोका असल्याचा कोणताही पुरावा नाही.

याचिकाकर्त्यांनी यापूर्वीच पोलिस अधिक्षकांकडे सुरक्षेसाठी अर्ज केला आहे. पोलिसांना जर काही धोका आढळून आला तर ते कायद्यानुसार पुढील पावले उचलतील, असेही कोर्टाने म्हटले आहे. याचिकाकर्ते आपला हक्क म्हणून सुरक्षा मागू शकत नाहीत, असेही कोर्टाने निकाल देताना म्हटले आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT