vainkeya nayadu
vainkeya nayadu Sarkarnama
देश

अधिवेशनाच्या तोंडावर कोरोनाचा स्फोट: उपराष्ट्रपतींनाही लागण

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर १ फेब्रुवारीरोजी लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र आता अधिवेशन तोंडावर असतानाच संसदेत कोरोनाचा अक्षरशः स्फोट झाला आहे.

देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे उपसभापती वैंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Vice president Vainkeya Naidu covid Positive) याशिवाय पार्लमेंट हाऊस कॉम्प्लेक्समध्ये ८७५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यांपैकी २७१ जण राज्यसभा सचिवालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

याबाबत उपराष्ट्रपती सचिवालयाने आज रविवारी (ता.२३) माहिती दिली आहे. सचिवालयाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, उपराष्ट्रपती व्यैंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu) हे हैदराबादेत असून त्यांची कोरोना (Corona) चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पुढील एक आठवडा स्वविलगीकरणात राहणार आहेत. उपराष्ट्रपती यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःला विलगीकरणात ठेवून कोरोना चाचणी करावी, असा सल्ला दिला आहे.

सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यात बहुतांश ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटची रुग्णसंख्या आढळत असून ती १० हजारांच्या वर गेली आहे. दरम्यान, देशात आज ३ लाख ३३ हजार ५३३ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर देशात सध्या २१ लाख ८७ हजार २०५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच देशाचा पॉझिटिव्हिटी रेट १७.७८ टक्के आहे तर आठवड्याचा पॉझिटिव्ही रेट १६.८७ टक्के आहे. देशाचा रिकव्हरी रेट ९३.१८ टक्के आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT